सातारा

नेदरलॅंडच्या पॉली जेस्सीवर पाटणात जीप चोरीचा गुन्हा

जालिंदर सत्रे

पाटण (जि. सातारा) : परदेशी महिलेने निसरे (ता. पाटण) येथून जीप चोरून नेली. जीप भरधाव चालवत असताना जीपचा विजयनगर येथे दुभाजकाला धडकून काल अपघात केला होता. त्या महिलेवर मल्हारपेठ दूरक्षेत्रात जीप चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे. त्या महिलेला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पॉली जेस्सी असे संबंधित महिलेचे नाव आहे. ती नेदरलॅंड येथील रहिवाशी आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, नावडी येथील ज्ञानदेव कृष्णत नलवडे यांचे किराणा मालाचे दुकान आहे. मल्हारपेठ येथे दुकानाचे साहित्य खरेदी करून जीपमध्ये ठेवले व घरी निघाले होते. वाटेत निसरे फाटा येथे जीप (एमएच 13 एन 549) कऱ्हाड-चिपळूण महामार्गावर उभी करून एका दुकानात खरेदीसाठी गेले. जीपची चावी जीपलाच राहिली होती. त्याचदरम्यान पॉली कोरनेलिया जेस्सी (वय 24, मुळ रा. क्रोनिजब्रिजे, नेदरलॅंड) ही परदेशी महिला त्याठिकाणी आली होती. जीपला चावी पाहिल्यानंतर त्या परदेशी महिलेने जीप चालू केली व कऱ्हाडकडे भरधाव वेगाने निघाली. परिसरातील काही जणांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिस गस्तसाठी आलेल्या होमगार्डना झालेली घटना सांगितली. होमगार्डनी मोटारसायकलवरून जीपचा पाठलाग केला. मात्र, विजयनगर येथे भरधाव वेगात असणाऱ्या जीपने एका कारला धक्का दिला व रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली आणि जीप पलटी झाली. मल्हारपेठ दूरक्षेत्रात ज्ञानदेव नलवडे यांनी गाडी चोरीची फिर्याद दिली आहे. कऱ्हाड पोलिसांकडून परदेशी महिलेला पाटण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला निसरे फाटा येथे कुठून आली, याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करीत आहेत. 

अपघाताबद्दल कोठडी 

कऱ्हाड : निसरे फाट्यावरून जीप घेऊन पळून आलेल्या नेदरलॅंड येथील महिलेवर विजयनगर येथे अपघात केल्याबद्दल शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला. तिला पोलिसांनी सकाळी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. त्यावेळी तिला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यावेळी तिला जामीन मंजूर झाला. मात्र, तिला पाटण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मल्हारपेठ येथे तिच्यावर वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT