job news State Government Support to Agniveer Yojana Prithviraj Chavan criticize politics satara
job news State Government Support to Agniveer Yojana Prithviraj Chavan criticize politics satara esakal
सातारा

Agniveer Yojana : राज्य सरकारचा अग्नीवीर योजनेला पाठिंबा; पृथ्वीराज चव्हाणांचा पलटवार

हेमंत पवार

कऱ्हाड : कंत्राटी भरतीतील अग्नीवीर योजना ही मातृ योजना आहे. त्यालाच या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार समर्थन करत आहे, असा पलटवार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

विदर्भातील ज्या विकास कामांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगीतले. कंत्राटी भरतीचा निर्णय महविकास आघाडी सरकारच्या काळातील होता असे सांगुण उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे. त्यावर भाजपकडून आज अनेक ठिकाणी महाविकास आघाडीविरोधात आंदोलनही करण्यात आले.

त्यानंतर आमदार चव्हाण माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने काढलेला २३ सप्टेंबरचा महत्त्वांच्या कार्यकारी पदांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी चुक सुधारली ही चांगली गोष्ट आहे. मात्र कंत्राटी भरतीमधील अग्नीवीर योजना ही मातृयोजना आहे. त्यालाच राज्यातील सत्ताधारी सरकारने समर्थन दिले आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय रेट्यामुळे त्यांना रद्द करावा लागला. आता, तसाच रेटा आल्यामुळे हा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा लागला आहे.

त्यामुळे अग्नीवीर योजनाही रद्द करावी, अन्यथा जनतेचा रेटा तुम्हाला माहितीच आहे, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, नागपूर कराराप्रमाणे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतले जाते. यानिमित्ताने विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे.

सत्ताधारी असताना आणि विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घ्यायची हा या सरकारचा दांभिकपणा आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न झाल्याने फडणवीस यांनी तत्कालीन सरकारवर टीका केली होती. आता आपलीच जुनी टीका त्यांनी आठवावी. विदर्भात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता आहे. ललित पाटील या संशयीताचे उच्चपदस्थ लोकांशी संबंध असावे. सरकार, प्रशासनात कोणती मंडळी यात गुंतले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली.

सरकारला वाटते निवडणुकांची भिती

राज्यातील सत्ताधाऱ्यांना लोकांपर्यंत जाण्याची भीती वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्हाला घेता येत नाहीत. लोकांमध्ये रोष आहे आणि या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार असल्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुला लांबलेल्या असल्याचेही आमदार चव्हाण यांनी सांगीतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas War: ''मोदींच 'हे' करु शकतात, कारण ते ग्लोबल लिडर आहेत'', पॅलेस्टाईनच्या पंतप्रधानांचं पत्र

T20 WC 24 Super 8 : सुपर-8ची शर्यत रोमांच मोडवर! 20 पैकी 11 संघांचा पत्ता कट; आता एका जागेसाठी दोन टीममध्ये टक्कर

Ganga Dussehra 2024: गंगा दशहराला काय करावे अन् काय नाही? वाचा एका क्लिकवर

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT