सातारा

शिवार झाले हिरवेगार; ज्वारी, सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवीत

विलास खबाले

विंग (जि.सातारा) : अनुकूल वातावरणामुळे विंगसह परिसरात ज्वारी पीक सध्या समाधानकारक स्थितीत आहे. चांगल्या उत्पादनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

कोरोना संकटातही शेतकऱ्यांनी वेळेचा सदोपयोग करताना संपूर्ण भिस्त खरीप हंगामावर केंद्रित केली आहे. विशेषतः ज्वारी समाधानकारक स्थितीत आहे. त्यासाठी त्यास अनुकूल वातावरणच कारणीभूत ठरले आहे. ठिकठिकाणी दाणेदार कणीस सहज लक्ष वेधून घेत आहे. शिवारही हिरवेगार दिसत आहे. साधारण जूनच्या दुसऱ्या पंधरावड्यात खरिपाची पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या आकडेवाडीनुसार तालुक्‍यात आठ हजार 540 हेक्‍टरवर ज्वारी पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे, तर 12 हजार 370 हेक्‍टरवर सोयाबीन पीक आहे. मिळालेल्या अनुकूल वातावरणात पिकाची वाढ अपेक्षित झाली आहे.

बातमी कानावर पडताच कऱ्हाडातील पालक, विद्यार्थी आनंदले

विशेषत मागील पंधरावड्यात कोषातून बाहेर पडलेले ज्वारीचे कणीस आता ऐनभरात आहे. जुलै अखेरीस पावसाने परिसरात दडी मारली होती. खरीप धोक्‍यात येणार, की काय असे चित्र निर्माण झालेले होते. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी चक्राकार वादळी वाऱ्यासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यानंतर जिरवणीचा पाऊस झाला. पाणीपातळी स्तर उंचावला. विहिरी, तलाव भरले. खरीप पिकांना एकप्रकारे जीवदान त्यामुळे मिळाले. वादळी वाऱ्याचा ऊस पिकाला मात्र मोठा फटका बसलेला आहे.

आणखी किती दिवस ट्रेन बंद ठेवणार; हायकोर्टचा राज्य सरकारला सवाल

ठिकठिकाणी कोलमडून नुकसान त्याचे झाले आहे. मात्र, ज्वारी, सोयाबीनसारखी पिके तरारून निघाली आहेत. ती ऐनभरात आहेत. उत्पादकांतून चांगल्या उत्पादनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. मात्र, ज्वारी, सोयबीनच्या चांगल्या स्थितीमुळे शेतकऱ्यांनी थोडासा दिलासा मिळाला आहे. उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे.

सावधान... तुमच्या फेसबुकवरून अश्लील चित्रे पोस्ट होण्याचा धोका! कशी घ्याल काळजी?

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT