सातारा

सातारा : रुग्ण सेवेसाठी जम्बाे काेविड रुग्णालय सज्ज

प्रशांत घाडगे

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. सेंटरचे उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून रुग्णांना लवकरात लवकर उपलब्ध करा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
 
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड सेंटरच्या उभारणीसाठी मान्यता देवून सहकार्य केले. या सेंटरमध्ये 234 ऑक्‍सिजन बेड व 52 आयसीयू बेड असणार आहेत. डायलिसिस असणाऱ्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत, अशा रुग्णांसाठीही 4 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम व विद्युत सुविधेसाठी 5 कोटी 92 लाख 70 हजार, वैद्यकीय उपकरणांसाठी 6 कोटी 84 लाख 97 हजार 2061 रुपये, तर मनुष्यबळ व इतर गोष्टींसाठी 6 महिन्यांसाठी 13 कोटी 99 लाख 32 हजार इतका खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरात-लवकर कोविड सेंटर लोकांच्या सेवेसाठी येत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

पायल घोषविरोधात रिचा चड्ढा झाली आक्रमक : अब्रुनुकसानीचा ठोकला दावा  
 
जिल्ह्यातील बरेच बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी ऍन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. या ऍन्टीबॉडीज प्लाझ्माच्या उपचार पद्धतीने गंभीर बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी करत मीही प्लाझ्मा दान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. 

सेंटरचे शुक्रवारी उद्‌घाटन 

राज्यात काही महिन्यांपासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्य शासनाने जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला आहे. सामाजिक संस्था, स्वयंसेवकांनीही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे, अत्याधुनिक उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्‌घाटन 9 ऑक्‍टोबरला होणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

Video : वाईत घुमला मराठा एकजुटीचा आवाज


Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT