साताऱ्यात शिवसेनेकडून कंगना राणावतचा निषेध  sakal media
सातारा

साताऱ्यात कंगना राणावत यांचा निषेध

शिवसेनेकडून प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले; पुतळा घेतला पोलिसांनी ताब्‍यात

सकाळ वृत्तसेवा

सातारा : देश स्‍वातंत्र्याविषयी वादग्रस्‍त विधान केलेल्‍या अभिनेत्री कंगना राणावत यांचा आज येथे शिवसैनिकांनी निषेध करत प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले. आंदोलनाच्‍या पार्श्‍वभूमीवर त्‍याठिकाणी बंदोबस्‍तास असणाऱ्या पोलिसांनी आंदोलकांच्‍या हातातून राणावत यांचा प्रतीकात्‍मक पुतळा ताब्‍यात घेत जप्‍त केला.

अभिनेती कंगना राणावत यांनी देश २०१४ मध्‍ये स्‍वतंत्र झाला असून, १९४७ रोजी भीक मिळाली होती, असे वक्‍तव्‍य केले होते. या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याचा देशभर निषेध होत असून, ठिकठिकाणी राणावत यांच्‍याविरोधात देशद्रोहाचे गुन्‍हे नोंदविण्‍यात येत आहेत. याच अनुषंगाने आज येथील पोवई नाका परिसरात शिवसैनिकांनी आंदोलन करत राणावत यांचा निषेध केला, तसेच त्‍यांच्‍या प्रतीकात्‍मक पुतळ्यास जोडे मारले. या आंदोलनाच्‍या पार्श्वभूमीवर पोवई नाका येथे बंदोबस्‍तासाठी तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांच्‍या हातातून राणावत यांचा पुतळा हिसकावून घेत तो जप्‍त केला.

यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राणावत यांचा निषेध करत केंद्र सरकारने त्‍यांना दिलेला पद्मश्री पुरस्‍कार माघारी घेण्‍याची मागणी केली. या आंदोलनात सातारा, तसेच परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP vs Raghav Chadha : राघव चढ्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात, 'आप'चे आपल्याच खासदारावर गंभीर आरोप

School Development: शासनाचा निर्णय! माजी विद्यार्थ्यांच्या बळावर होणार शाळांचा कायापालट; शाळांमध्‍ये संघाची स्थापना..

Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"

Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

SCROLL FOR NEXT