सातारा

कण्हेरकरांचा एकच निर्धार, गावातून कोरोनाला करणार हद्दपार

किरण गाडे

कोंडवे (जि.सातारा) ः सातारा तालुक्‍यातील जिहे गावानंतर आता कण्हेर गावात कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ लागला आहे. कण्हेरमध्ये काल रात्री आलेल्या अहवालात तब्बल 27 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. येथील एकूण संख्या 54 वर पोचली असून, एकाचा मृत्यू झाला आहे, असे कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शनकुमार मेहता यांनी सांगितले.
कशात अडकली पोलिसांची रेनकोट खरेदी 
 
आरोग्य विभागाकडून घेतलेल्या शिबिरामध्ये 38 पैकी 18 रुग्ण, तर एका रुग्णाच्या संपर्कातील क्वारंटाइन केलेले नऊ असे एकूण 27 रुग्ण काल आढळले आहेत. यामध्ये 22, 40, 34, 40, 55, 40, 25, 62, 30, 54, 18, 40, 37, 65 वर्षे वयाच्या महिला, तर 51, 50, 90, 56, 22, 36, 57, 16, 16, 12, 7, 11, 5 वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे. संबंधित आरोग्य विभाग व ग्रामसमितीकडून आवश्‍यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. येथील आशा वर्कर्सकडून घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, संपूर्ण गाव सील करण्यात आले असून, गावात येणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. 15 दिवसांपूर्वी गावातील बाधित युवकांच्या संपर्कात आल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. बाधितांच्या निकट संपर्कातील असलेल्यांना विलगीकरणात कक्षात दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हिरव्या कुरणांमुळे मेंढपाळ, पशुपालक सुखावले, माणदेशात पाणीपातळीही उंचावली
 
कण्हेरची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन मोलाचे प्रयत्न करत आहे. यामध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच ग्रामपंचायतस्तरावरही प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, 77 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून, यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. गावातील कोणीही घाबरू नये, योग्य खबरदारी घेतल्यास कोरोनावर नक्कीच विजय मिळवू शकतो, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शनकुमार मेहता यांनी सांगितले. या वेळी ग्रामविकास अधिकारी बाळकृष्ण सावंत, सहायक पोलिस निरीक्षक, तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 


होम क्वारंटाइन व्यक्तींनी पुरेशी काळजी घेतल्यास कण्हेरमधील साखळी खंडित होण्यास वेळ लागणार नाही. 
- बाळकृष्ण सावंत, ग्रामविकास अधिकारी 

संपादन : संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT