सातारा

पालकांना दिलासा; दहावीतील 31 विद्यार्थ्यांचा Covid 19 अहवाल आला निगेटिव्ह

सचिन शिंदे

क-हाड (जि. सातारा) : शहरातील एसएमएस या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील इयत्ता दहावीतील 190 विद्यार्थ्यापैकी 31 विद्यार्थ्यांचा काेविड 19 तपासणी अंती अहवाल निगेटिव्ह आला आहे. आगामी काळात 158 विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागातून देण्यात आली. 

येथील एसएमएस या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील इयत्ता दहावीचा एक विद्यार्थी गुरुवारी (ता.18) कोरोना बाधित आल्यानंतर सर्वांची घाबरगुंडी उडाली. सुरक्षितता म्हणून शाळा व्यवस्थापनाने आठ दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची काेविड 19 ची चाचणी घेण्यास प्रारंभ झाला. यामध्ये प्राथमिक टप्प्यात तब्बल 80 जणांचे अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी 31 विद्यार्थी तर 49 कर्मचा-यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, प्रशासन व पालकांना थाेडा फार दिलासा मिळाला आहे.

पुढील आठ दिवस शाळा बंद राहणार असल्याने या कालावधीत ज्यांच्या काेविड 19 च्या टेस्ट झालेल्या नाहीत, त्या केल्या जाणार आहेत. पालिकेचे शाळेस उत्तम सहकार्य लाभत आहे. पालिका व नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.

एकूण विदयार्थी 190

एक विद्यार्थी काेराेनाबाधित 

31 विद्यार्थी निगेटीव्ह 

158 विद्यार्थी यांची काेविड 19 ची तपासणी हाेणार

'स्वाभिमानी'ने राेखला सातारा -पंढरपूर महामार्ग; पाेलिसांकडून आंदाेलकांची उचलबांगडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Alert Maharashtra : कोकणासह सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिमुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज, मॉन्सूनचे ढग आणखी तीव्र

Belhekarwadi farmers: राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पावरून संघर्ष तीव्र; अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव, रेल्वे भूसंपादनाविरोधात बेल्हेकरवाडीत संतापाचा उद्रेक

Beed: गाय-म्हैस नाही, तरीही दुधाचा महापूर कसा? ; आष्टी तालुक्यात दुधाच्या नावे पसरतेय ‘पांढरे विष’; भेसळमाफिया मोकाटच

Beed: ट्रक उलटला; परळी-गंगाखेड वाहतूक खोळंबली

"दिग्दर्शकाने रिडींगला बोलावलं आणि सेटवर कुणीच नव्हतं" अभिनेत्रीने सांगितला पहिल्या सिनेमाचा भयानक अनुभव

SCROLL FOR NEXT