Karad APMC Election Result sakal
सातारा

Karad APMC Result : कॉंग्रेसकडुन राष्ट्रवादी-भाजपचा करेक्ट कार्यक्रम; पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उंडाळकरांनी राखली सत्ता

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला.

हेमंत पवार

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला.

कऱ्हाड - कऱ्हाड (जि. सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या लोकनेते (स्व.) विलासराव पाटील काका रयत पॅनेलने बाजी मारली. तर माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या शेतकरी विकास पॅनेलला मतदारांनी नाकारले. आमदार चव्हाण आणि अॅड. उंडाळकर यांच्या गटाचे 12 उमेदवार निवडणुक आले आहेत तर आमदार पाटील आणि भोसले यांच्या गटाला 6 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडुन राष्ट्रवादी आणि भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आला.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सतारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती. बाजार समितीच्या निवडणुकीतुन पुढील निवडणुकांची पेरणी होणार असल्याने या निवडणुकीत आपल्याच पॅनेलला बहुमत मिळावे यासाठी नेत्यांनी शक्ती पणाला लावली होती.

आमदार चव्हाण व उंडाळकर गटाच्या रयत पॅनलची एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे उर्वरीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. काल रविवारी या निवडणुकीसाठी ४१९३ मतदारापैकी ४०७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ९७.१९ टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज निवडणूक निरीक्षक तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधिकारी संदीप जाधव यांच्या उपस्थितीत झाली.

उमेदवार, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा सोसायटी गटाची मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला. त्यादरम्यान व्यापारी आणि त्यानंतर ग्रामपंचायत गटाची मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये आमदार चव्हाण, अॅड. उंडाळकर यांच्या लोकनेते (स्व) विलासराव पाटील काका रयत पॅनेलने बाजी मारुन 12 जागा जिंकल्या. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले आहे. तर आमदार पाटील आणि भोसले यांच्या गटाच्या शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT