Karad Bus Stand sakal
सातारा

Karad Bus Stop : कऱ्हाड बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने नुकतीच 147 बसस्थानकांची पाहणी केली.

हेमंत पवार

कऱ्हाड - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने नुकतीच 147 बसस्थानकांची पाहणी केली. त्यामध्ये कऱ्हाड (जि.सातारा) येथील बसस्थानकाने तिसऱ्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक क्रमांक पटकावला.

राज्य परिवहन महामंडळाकडुन प्रवाशांची वाहतुक खासगी प्रवासी वाहतुकीपेक्षा चांगली व्हावी, प्रवाशांना बसस्थानक आवारात आल्यावर स्वच्छ वातावरणात त्या परिसरात थांबता यावे या हेतुने राज्यात एसटी महामंडळाकडुन एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबण्यात येत आहे.

त्यासाठी राज्यातील ५८० एसटी बस स्थानकात हे अभियान राबवण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. ही स्पर्धा शहरी विभाग- अ वर्ग, निम शहरी विभाग- ब वर्ग, ग्रामीण विभाग-क वर्ग या तीन विभागातील बस स्थानकात घेण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर, अमरावती अशा सहा प्रादेशिक विभागात पार पडली.

त्यामध्ये शहरातील मुख्य बस स्थानक, तालुका बस स्थानक व ग्रामीण भागातील गावागावांतील बस स्थानकांची स्वच्छता व सुशोभीकरण याचा समावेश करण्यात आला होता. त्याअंतर्गत नुकतेच राज्यातील २५० आगारातील अ वर्गातील १४७ बसस्थानकांची राज्यस्तरीय समितीने पाहणी केली. त्यात येथील बसस्थानकाचीही पाहणी रत्नागिरीच्या विभागीय समितीने केली होती.

त्यामध्ये त्या समितीने समितीने कराड बसस्थानकातील सच्छता, रंगरंगोटी, प्रवाशांच्या सोयीसाठी केलेल्या उपाययोजना, सेल्फी पॉईंट, वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, प्रवासी आरक्षण कक्ष, पुरुष व महिला स्वच्छतागृह, चालक-वाहक विश्रांती गृह, आरक्षण खिडकी, पास विभाग चौकशी खिडकीची पाहणी करुन गुणांकन दिले होते. त्या पाहणीचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन येथील एसटी आगाराने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्रात कऱ्हाड आगाराने तिसऱ्या सर्व्हेक्षणात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तयाचे श्रेय आगारातील चालक- वाहक, कार्यशाळा कर्मचारी, सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे आहे. सर्वांनी सामाहुक प्रयत्न केल्यामुलेच हे यश मिळाले आहे. राज्यातील शेवटच्या चौथ्या सर्व्हेक्षणातही कऱ्हाड आगार महाराष्ट्रात नावलौकिक मिळवले.

- शर्मिष्ठा पोळ, एसटी आगार व्यवस्थापक कऱ्हाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT