सातारा

'चले जाव' मोर्चाच्या स्मृतिस्तंभास कऱ्हाडकरांचे अभिवादन

हेमंत पवार

कऱ्हाड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. दादासाहेब उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली 24 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सत्तेविरोधात काढलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाचा काल सोमवारी (ता. २४) 78 वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्त येथील तहसील कार्यालयातील मोर्चाच्या स्मृतिस्तंभास प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी यांनी अभिवादन केले.
 
नव्याने बांधलेल्या येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्मृतिस्तंभाची पुनर्स्थापना करण्यात आली. त्याठिकाणी दरवर्षी शासनाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजिला जातो. आजच्या स्मृतिदिनी स्वातंत्र्यसैनिक हिंदुराव जाधव, दादा उंडाळकर ट्रस्टचे विश्वस्त गणपतराव कणसे, शंकरराव जाधव, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, प्रा. धनाजी काटकर, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना बॅंकेचे अध्यक्ष रोहित पाटील, पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, दूध संघाचे संचालक अधिकराव जगताप, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक जयवंतराव थोरात, मंडलाधिकारी पंडित पाटील, अॅड. अशोक मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील कॉंग्रेसच्या अधिवेशनात इंग्रजांना 'चले जाव'ची घोषणा केली. त्यानंतर देशभर वणवा पेटला. सातारा जिल्हाही यामध्ये अग्रेसर होता. 'चले जाव' चळवळीत दादा उंडाळकर व त्यांचे सुपुत्र शामराव पाटील सक्रिय होते. 24 ऑगस्ट 1942 रोजी स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत असणारे यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड तहसील कचेरीवर दादासाहेब उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. तालुक्‍यातून हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले. शांततेने निघालेला मोर्चा तहसील कचेरीवर तिरंगा फडकवल्यानंतर थांबला. त्यानंतर उंडाळकर यांना अटक झाली होती. त्या मोर्चाच्या स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Robbery: पुण्यात अधिकारीच सुरक्षित नाहीत? मध्यरा‍त्री बंगल्यात घुसून विंग कमांडरच्या तोंडावर हात ठेवला अन् धक्कादायक दरोडा!

​PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार? जाणून घ्या सर्वात महत्वाची अपडेट

Latest Marathi News Live Updates : दडी मारलेल्या पावसाची रत्नागिरीमध्ये दमदार हजेरी

loan waiver: कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा हक्क: राज्य उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, सरकारला दिलेल्या आश्‍वासनाचा पडला विसर

Pune Municipal Corporation: आपत्ती निवारण कक्ष कार्यान्वित; दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप शिल्लक

SCROLL FOR NEXT