karad city police arrested one for violation of tadipaar punishment satara Sakal
सातारा

Satara Crime : तडीपारीच्‍या उल्लंघनप्रकरणी एकास अटक; कऱ्हाड शहर पोलिसांची कामगिरी

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा या तालुक्यांतून हद्दपार केले होते.

सकाळ वृत्तसेवा

Satara News : शहर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंडास पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा या तालुक्यांतून हद्दपार केले होते.

मात्र, तरीही तो त्याच्या गावी आल्याने त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कऱ्हाड) असे संबंधिताचे नाव असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी, की शहर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंडाने शहरात विविध प्रकारचे गुन्हे करून त्याच्‍यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही तो प्रशासन व न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करीत होता.

त्यामुळे त्याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव शहर पोलिस ठाण्याकडून पाठवला होता. प्रस्तावाच्‍या चौकशीनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा या तालुक्यांतून हद्दपार केले होते. त्यामुळे त्या आदेशाची अंमलबजावणी करून खोपोली, येथे सरकारी इतमामात सोडून संबंधित पोलिसांना त्याबाबत माहिती देण्यात आली होती.

दरम्‍यान, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक निरीक्षक गणेश कड व पोलिस अंमलदारांना तडीपार गुंडांच्या हालचाली पडताळण्याच्या सूचीत केले होते.

तडीपार असतानाही अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कऱ्हाड) हा त्याच्‍या गावी येऊन राहिल्‍याची माहिती शहर पोलिस निरीक्षक पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस अंमलदारांना सदर बातमीची खातरजमा करून कारवाई करण्‍याचे आदेश दिले.

त्यानुसार सहायक फौजदार संजय देवकुळे, हवालदार अमित पवार, आनंदा जाधव, महेश शिंदे यांनी आज सकाळी आठच्या सुमारास विरवडे गावी जाऊन तडीपार अक्षय नाटकर याची खात्री केली. त्या वेळी तो दिसला आणि पोलिसांना ओळखून तो पळून जात असताना त्यास शिताफीने पकडले. त्या वेळी पोलिसांनी त्याचेकडे परवान्याबाबत खात्री करून ताब्यात घेऊन अक्षय नाटकर यांस अटक केली आहे.

कऱ्हाड शहर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगार, तसेच हद्दपार गुंडांच्या हालचाली पडताळून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारे कोणी निष्पन्न झाल्‍यास यापुढील काळातही अशाच प्रकारे कडक कारवाई करण्यात येईल.

- के. एन. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT