karad dhebewadi accident police vehicle hit 4 persons one killed 3 injured satara sakal
सातारा

Satara Accident : रस्त्यावर उभ्या असणाऱ्या चौघांना पोलीस गाडीने उडवलं; चालकावर गुन्हा दाखल

रस्त्या कडेला उभा असलेल्या चौघांना पोलिसांच्या व्हॅन उडवल्याने एकजण ठार तर तिघे जखमी

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : रस्त्या कडेला उभा असलेल्या चौघांना पोलिसांच्या व्हॅन उडवल्याने एकजण ठार तर तिघे जखमी झाले आहेत. कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यवर कुसूर (ता. कऱ्हाड) येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास घटना घडली. सुजल उत्तम कांबळे (वय 17 वर्ष, रा. कोळेवाडी, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे चालक हवालदार शंकर खेतमर यांच्यावर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

कऱ्हाड-ढेबेवाडी रस्यावर कसूरच्या हद्दीत ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या भरधाव गाडीने रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या चौघांना उडवले. त्यातील एक जागीच ठार, अन्य जखमी आहेत. अन्य दोघे जण या अपघातातून बालबाल बचावले. घटनेनंतर कुसूर येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड मजुरांची टोळी कुसूरमध्ये आणण्यात आली होती. रात्री साडे अकराच्या सुमारास एका वाहनातून टोळी उतरत होती. त्यावेळी कोळेवाडीतील चौघे युवक रस्त्याकडेला उभे होते. त्यावेळी कोळेवाडी कडून ढेबेवाडीकडे निघालेल्या पोलीस व्हॅनने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या चार तरूणांना उडवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT