karad sakal media
सातारा

कऱ्हाडला पहिल्याच गुळाच्या सौद्यात चार हजारांवर दर

कऱ्हाड बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, संचालक जगन्नाथ लावंड, सचिन गुणवंत, सचीव बी.डी. निंबाळकर यांच्या उपस्थितीत गुळ सौदा झाला.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कऱ्हाड (जि.सातारा) येथील शेती उत्पन्न बाजार समितीत नवीन गुळ विक्रीचा प्रारंभ आज मंगळवारी झाला. पहिल्याच सौद्यात सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कंदुर येथील शेतकरी सुभाष पाटील या शेतकऱ्याच्या गुळाला चार हजार १०० रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला.

कऱ्हाड बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, संचालक जगन्नाथ लावंड, सचिन गुणवंत, सचीव बी.डी. निंबाळकर यांच्या उपस्थितीत गुळ सौदा झाला. बाजार समितीतील शिवतेज ट्रेडींग कंपनी आणि विक्रांत ट्रेडींग कंपनी या अडत दुकानात गुळाचा सौदा झाला. शिवतेज ट्रेडींग कंपनीत शिराळा तालुक्यातील कंदुर येथील शेतकरी सुभाष पाटील या शेतकऱ्यच्या गुळाला चार हजार १०० रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला. तो गुळ डी.के.ब्रदर्स ट्रेडींग कंपनीने या व्यापाऱ्यांनी खरेदी केला.

आजच्या सौद्यात १५७ क्विंटल गुळाची विक्री होवुन गुळाला सरासरी तीन हजार ७५० रुपये दर मिळाला. यावेळी कोल्हापुर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील तळाशी येथील सारंग बिऱ्हाडे तर कंदुरचे पाटील यांचा सत्कार बाजार समितीच्यावतीने सभापती देसाई यांनी केला. शेतकऱ्यांनी रसाळ, कणीदार, चिक्की गुळ मार्केटला विक्रीस आणावा असे आवाहन सभापती देसाई यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Jilha Bank President : सातारा जिल्हा बँकेत भाजपला धक्का; राष्ट्रवादी-शिवसेनेची सत्ता, उदयसिंह उंडाळकर अध्यक्ष तर दीपक चव्हाण उपाध्यक्ष

बॅटने मारहाण प्रकरणी खोक्या भोसलेसह ६ जणांची निर्दोष सुटका; कोर्टात काय घडलं?

Pune Fake IAS Officer Scam: फोटो, बातम्या अन् IAS पदाचा बनाव! पुण्यात 21 वर्षीय तरुणाने लुटले 35 लाख

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट चकमकीत ठार

'रामायण'ची गाणी हिट का झाली नाहीत? जावेद अख्तर यांचे उत्तर; म्हणाले, 'मी चांगला रायटर आहे...'

SCROLL FOR NEXT