crop loss rain destroyed grass farmers damage Karad  sakal
सातारा

Satara : पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

पिकांच्या नुकसानीने शेतकरी हतबल; २० ते ५० टक्क्यांपर्यंत फटका

- हेमंत पवार

कऱ्हाड : ऐन सुगीच्या हंगामात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान वाढले आहे. सोयाबीन, भुईमूग, बाजरी, भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. पावसाबरोबरच्या वाऱ्याने काढणीस आलेले भात पीक मोडून पडले आहे. भाजीपाल्यासह फळबागांमध्ये रोग-किडींचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे.

हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज सांगितल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने खरीप हंगामातील पिकांचे उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांनी सोसायट्या, बॅंका, पतसंस्थांची कर्जे काढले. त्यातून पिके फुलवली. पहिल्या टप्प्यात पाऊसही चांगला झाला. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, जिल्ह्यात आठवडाभरातील पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मका, भात पिकांचे नुकसान झाले. पावसामुळे भात, भुईमूग, सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. दसऱ्यानंतर भात कापणी, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात होते.

खटाव तालुक्यात उशिरा लागण होणाऱ्या कांद्याची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने भाजीपाला, टोमॅटो, मिरची, कोबी या पिकांनाही फटका बसला आहे. भाजीपाला, फळभाज्या आणि फळबागाही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाल्या आहेत. पावसाबरोबरच्या वाऱ्याने काढणीस आलेले भात पीक मोडून पडले आहे. भाजीपाल्यासह फळबागांमध्ये रोग- किडींचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. सुमारे २० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

अवकाळी पावसामुळे अजूनही शेतात पाणी साचले आहे. भात कापणी, भुईमूग काढणी खोळंबली आहे. काही ठिकाणी भात अर्ध्यावरच शेतात पडले आहे. कापलेल्या पिंजरात पाणी तुंबल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

- उत्तमराव चव्हाण, शेतकरी.

ऊसही झाला आडवा

यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पिकविलेला ऊस चांगलाच तरारून आला होता. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन मिळून चार पैसे जादाचे मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, सततच्या पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे उभा असलेला ऊस आडवा झाला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT