Prithviraj Chavan and PM Narendra Modi esakal
सातारा

Prithviraj Chavan : मोदींनी निवडणूक जिंकल्यास लोकशाही संपेल; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

भाजपला विरोधी पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे एका पक्षाची सत्ता आली तर एका पक्षाची हुकुमशाही होणार आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - भाजपला विरोधी पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे एका पक्षाची सत्ता आली तर एका पक्षाची हुकुमशाही होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष संविधानामध्ये बदल करण्याची भाषा करतात. तरीही मोदी गप्प आहेत. या लोकांना संविधानसुद्धा धोक्यात आणायचे आहे.

येणारी तिसरी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिंकली तर देशातील लोकशाही संपेल, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पवारवाडी-नांदगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन व अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, इंद्रजित चव्हाण, बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, शिवाजीराव मोहिते, नरेंद्र नांगरे - पाटील, नितीन थोरात, दिग्विजय पाटील, अधिकराव जगताप, उदय पाटील, अश्विन चव्हाण, देवदास माने आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण म्हणाले, भाजपला विरोधी पक्ष संपवायचे आहेत. त्यामुळे एका पक्षाची सत्ता म्हणजे एका पक्षाची हुकुमशाही होणार आहे. हे जाणून लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीत जागृत राहणे गरजेचे आहे.

मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष संविधानामध्ये बदल करण्याची भाषा करतात. तरीही मोदी गप्प आहेत. या लोकांना संविधानसुद्धा धोक्यात आणायचे आहे. बहुजन आणि दलितांचे विचार तोडून देशात भिन्नता वाढवत तेढ निर्माण करायचा त्यांचा डाव आहे. यातून येणारी तिसरी लोकसभा निवडणूक मोदींनी जिंकल्यास देशातील लोकशाही संपेल.

महाराष्ट्रातील जनता फितुरीला साथ देणार नाही. तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत येवून कोणी गोंडसपणे आश्वासने सांगतील. त्यांच्या नादाला लागू नका. मोदींना हरवण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी व देशात इंडिया आघाडी झाली आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी रहावे.

ते म्हणाले, कऱ्हाड दक्षिणमधील अडचणीचे अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दळणवळण व पाण्याचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील आहे. उंडाळे प्रादेशिक योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मी सरकारकडे आग्रह केला. या योजनेचे पुनर्जीवन होणार आहे. व नव्याने समाविष्ठ केलेल्या ग्रामपंचायतींना मोठया प्रमाणात शुद्ध पाण्याचा पुरवठा मिळणार आहे.

अ‍ॅड. उंडाळकर म्हणाले, पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून कऱ्हाड दक्षिणमधील ४० ते ४२ पाणीयोजना मार्गी लागल्या आहेत. परंतु काही मंडळी या योजनांचे श्रेय घेत आहेत. विरोधकांचा भूलथापांचा खेळ ओळखावा. या प्रतिगामी लोकांकडून आपण सर्वांनी वाचले पाहिजे.

मनोहर शिंदे, अजितराव पाटील, नांदगावचे माजी सरपंच टी. के. पाटील, प्रा. धनाजी काटकर यांची भाषणे झाली. सागर कुंभार यांनी प्रास्ताविक केले. आकाश तडाखे यांनी सूत्रसंचालन केले. नांदगावचे उपसरपंच अधिकराव पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Vande Bharat Train Route : मुंबई, पुणे, सोलापूर, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार; जेवणाच्या बिलासह तिकीट

Kangana Ranaut: ''...तर आम्हाला आतापर्यंत मुलं झाली असती'', चिराग पासवान यांचं नाव घेऊन कंगना रणौत भलतंच बोलल्या

‘ही दोस्ती तुटायची नाय’गाण्याव अशोक सराफ-सचिन पिळगांवकरांचा धमाकेदार डान्स; सोशल मीडियावर Viral Video

Ujjain: महाकाल भक्तांना धक्का! आता 'फ्री'मध्ये पाहता येणार नाही भस्म आरती; मंदिर समितीचा मोठा निर्णय, पाहा नवीन नियम

Train Stopped For Robbery Case : थरारक घटना! मानवत रोडवर सिग्नल यंत्रणा निकामी करून एक्स्प्रेस लुटली; महिला प्रवाशांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT