apmc photo
apmc photo sakal
सातारा

Karad : बाजार समिती निवडणुकांसाठी ‘सहकार’ विभागाची नवीन अधिसूचना जारी

हेमंत पवार

बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अधिसुचना जारी करण्यात आली आहे.

कऱ्हाड - बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अधिसुचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमुळे नव्याने निवडून आलेल्या कृषी पतसंस्था (सोसायटी), बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नवीन मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःहुन उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज करायचे आहेत. या नवीन मतदारांमुळे यावेळच्या बाजार समितीच्या निवडणुका चुरशीने होतील अशी चिन्हे आहेत.

अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीची मुदत अडीच वर्षापुर्वीच म्हणजे २०२० सालीच संपली आहे. त्याचबरोबर मध्यंतरी कोरोना काळात निवडणुकाही घेता आल्या नाहीत. त्यामुळे अनेक बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. दरम्याच्या काळात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर केला होता. त्यानुसार पुणे वगळता राज्यातील प्रमुख बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होवुन त्याबाबतची प्रक्रीयाही सुरु झाली होती.

त्या कार्यक्रमानुसार २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान तर ३० जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होते. मात्र बाजार समित्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठांत अनेक वेगवेगळ्या याचीका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे समोर अनेक याचिका प्रलंबित होत्या. गेल्या काही दिवसांपासून सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी नागपूर खंडपीठासमोर सुरू होती. त्या प्रकरणी नागपूर खंडपीठाने निकाल देवुन 30 एप्रिलपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी राज्य सहकारी प्राधिकरणाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार मतदार यादीत जुन्याच सदस्यांची नावे होती.

दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. काही सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका अजूनही सुरुच आहेत. नव्याने निवडून आलेल्या व येणाऱ्या सदस्यांना बाजार समितीच्या मतदारयादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे काहीजणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने त्यामध्ये सुधारणा करणारी अधिसूचना जारी केली आहे.

त्यानुसार आता ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थांच्या नवीन निवडून आलेल्या सदस्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर पाच दिवसापर्यंत नवीन सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावे, असेही त्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. मात्र संबंधित नवीन सदस्यांनी उपनिबंधक यांच्याकडे त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्या अर्जावर उपनिबंधक पडताळणी करुन त्यासंदर्भातील निर्णय घेणार आहेत. त्यामुळे यावेळच्या बाजार समितीच्या निवडणुका चुरशीने होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

सातारा जिल्ह्यात होणार मोठी चुरस

सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, पाटण, जावली, कोरेगाव, फलटण, वाई, वडुज, लोणंद या नऊ बाजार समितीसाठी निवडणुका होणार आहेत. बाजार समितीसाठी सोसायटी गटातुन ११ सदस्य निवडले जातात. त्यामध्ये खुल्या गटातील उमेदवारासह दोन महिलांचा समावेश असतो. ग्रामपंचायतीतुन चार सदस्य निवडले जातात. त्यात ग्रापंचायतीतुन अनुसुचीत जमातीमधील एक, एक आर्थिक दुर्बल आणि अन्य दोन सदस्य निवडले जातात. त्याचबरोबर आडत व्यापारी गटातुन दोन तर हमाल मापाडी गटातुन एक सदस्य असे १८ सदस्य निवडले जातात. यावेळी नवीन सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने बाजार समितीसाठी चुरशीने मतदान होणार आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यात प्रसिध्द केलेल्या मतदारांच्या अंतिम यादीमध्ये कृषी पतसंस्था (सोसायटी), बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतीच्या सदस्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट नसेल त्या व्यक्तीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाच दिवस अगोदर त्यासंदर्भात उपनिबंधक यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. उपनिबंधक कार्यालयाकडुन त्या अर्जाची चौकशी केली जाईल. त्यानंतर निवडणुक अधिकारी त्या यादीत बदल करतील, असे म्हंटले आहे. त्यासाठी ३१ जानेवारी पर्यंत हरकतीही मागवण्यात आल्या आहेत.

- मनोहर माळी, जिल्हा उपनिबंधक, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT