सातारा

सातारा जिल्ह्यातील 'या' नगराध्यक्षा कोरोनाबाधीत; नगरसवेकांनाही व्हावे लागणार क्वारंटाइन

सचिन शिंदे

कऱ्हाड : कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कोरोनाबाधीत झाल्या आहेत. आज (बुधवार) सायंकाळी त्याची माहिती शहरात समजताच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून त्यांना घशात दुखणे, ताप येत होता. त्यांचा आज सकाळी स्वॅब घेतला हाेता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कोरोनाची बाधा कशी झाली याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी सांगितले. 
भाविकांनाे...श्री क्षेत्र जरंडेश्वरला जाताय, हे वाचा

नगराध्यक्षा शिंदे शुक्रवारपर्यंत (ता.17) पालिकेत येत होत्या. शनिवारपासून त्या कार्यालयात आल्या नाहीत. आजारी असल्याने येवू शकत नाहीत, असा निरोप त्यांनी दिला होता. त्या घरी उपचार घेत हाेत्या. दरम्यान त्यांचा काेराेनाचा अहवाल आज (बुधवार) सायंकाळी पॉझिटिव्ह आला. याबाबतची माहिती मिळताच त्यांचे कार्यालय सील करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यालयातील कर्माचाऱ्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे. परिणामी पालिकेत घबराट पसरली आहे. त्यांच्या रोज संपर्कात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नगरसवेकांनाही क्वारंटाइन करावे लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटात खळबळ; भाजप आनंदीत

शपथविधीनंतर जय भवानी, जय शिवाजी घोषणा देणाऱ्या उदयनराजेंचे व्यंकय्या नायडूंनी टाेचले कान 

याबाबत मुख्याधिकारी डांगे म्हणाले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कोरोनाबाधीत कशा झाल्या. त्याची माहिती घेत आहाेत. ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर अधिक स्पष्टता हाेईल.  त्यांच्या सहवासातील लोकांना क्वारंटाइन करावे लागणार आहे. त्यांच्या घरी, कार्यालयातील त्यांच्या नेहमीच्या सहवासातील नागरिकांची माहिती घेतली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT