सातारा

पृथ्वीराज चव्हाणांच्या गटात जल्लाेष, कऱ्हाडातील 'या' गटात सन्नाटा

सचिन शिंदे

कऱ्हाड ः पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना मिळालेली मुदतवाढ रद्द करून प्रशासकीय कारणास्तव त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाने डांगे यांची मुदतवाढ रद्द व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. अखेर त्यात त्यांना यश आले. श्री. डाके उद्या (शुक्रवारी) पालिकेत हजर होणार आहेत.
भाविकांनाे...श्री क्षेत्र जरंडेश्वरला जाताय, हे वाचा
 
येथील पालिकेचे मुख्याधिकारी डांगे यांचा येथील तीन वर्षांचा कार्यकाळ संपला. तीन वर्षांच्या काळात त्यांनी अत्यंत चांगले काम केले होते. त्यांच्याच काळात स्वच्छतेत कऱ्हाडचा देशात पहिला क्रमांक आला. स्वच्छतेत त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर मागील आठवड्यात त्यांचा कार्यकाळ संपला होता. त्यांची रीतसर बदली होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे गोंधळ उडाला. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा गटही मुदवाढ रद्द करण्यास सक्रिय झाला. जनशक्ती आघाडी मित्र मुदतवाढीच्या निर्णयावर कायम होती. चव्हाण गटाने कार्यकाळ संपल्यानंतरही मुख्याधिकारी डांगे यांना मुदवाढ कशी मिळाली. त्यावरून प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या. चव्हाण गटातर्फे मुदतवाढ देताना कोणत्या मुद्‌द्‌यावर देण्यात आली आणि ती देताना स्थानिक आमदारांना विचारले होते काय, असा प्रश्न विचारत त्यांची मुदतवाढ रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

महाबळेश्वर पोलिस ठाण्यातील कर्मचारी कोरोनाबाधित

काॅंग्रेस आमदार गटात कही खुशी, कही गम सारखी स्थिती
 
अखेर चव्हाण गटाला त्यात यश आले. मुख्याधिकारी डांगे यांची बदली झाल्याचे सायंकाळी आदेश आला. त्यांच्या जागी भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. डाके उद्या येथे हजर होणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे चव्हाण गटाला डांगे यांची बदली करण्यात अखेर यश आले आहे.
Edited By : Siddharth Latkar

ब्रेकिंग - कोल्हापूरमध्ये आज आणखी ७७ जणांना कोरोनाची बाधा...  

तरुणाईला खुणावतेय कृषी क्षेत्र, शेतीतून जातो शाश्‍वत रोजगाराचा राजमार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT