सातारा

थांबा! हेल्मेट घाला, प्रवासाला निघा; कऱ्हाड पोलिसांचे आहे लक्ष

हेमंत पवार

कऱ्हाड : महामार्गावरून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर पोलिसांनी आजपासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत एकाच दिवशी तब्बल 48 जणांवर कारवाई करून 24 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. वाहनधारकांनी यापुढे हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांनी केले आहे.
हेल्मेट घालण्यात कमीपणा कसला? अजित पवार 

पुणे- बंगळूर महामार्गावर शहराजवळून जातो. महामार्गावर हेल्मेट विना प्रवास करणे दंडनीय अपराध आहे. त्यामुळे अशा विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखेच्या प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

बॅगमध्ये सहज बसणारे फोल्डेबल आणि ऍडजेस्टेबल हेल्मेट ; बलवडीच्या संकेतचा अनोखा प्रयोग 

शहरातील कोल्हापूर नाका, हॉटेल पंकज, मलकापूर फाटा परिसरातील महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. त्याअंतर्गत एकाच दिवशी तब्बल 48 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना 24 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यापुढेही महामार्गावरील विना हेल्मेट दुचाकीस्वारावरील कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी यापुढे हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सरोजनी पाटील यांनी केले आहे.

तेवढं 'एनएचफाेर'चे खड्डे शेणाने भरा; वैदिक पेंटवरुन नितीन गडकरींना आवाहन

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

आरोग्य स्वातंत्र्य की रोगाचे पारतंत्र्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 ऑगस्ट 2026

ढिंग टांग : झुरळांचा झपुर्झा..!

SCROLL FOR NEXT