सातारा

ऐषआराम करण्यासाठी हृदया गुप्ताने 81 लोकांना 13 कोटींना फसविले; पुण्यासह नगर, बीड, सातारकरांचा कपाळावर हात

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) :  शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्‍क्‍यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील एकाने सातारा, नगर, बीड, पुणे जिल्ह्यांतील 81 लोकांची सुमारे 13 कोटींची फसवणूक केली असून, हे पैसे त्याने ऐषआरामासाठी वापरल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी संशयित हृदया रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटिस 3, रूम नं. 1109, 10 वा माळा, सुपर टेक, ओमिक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश) हा पोलिस कोठडीत आहे. 

पुणे येथील प्रॉफिट मार्ट शेअर मार्केटमध्ये गुप्ता नोकरीस होता. शेअर मार्केटमध्ये नोकरी करताना त्याची कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेऊन गुप्ताने कंपनीपेक्षा जास्त फायदा व हमखास प्रतिमहिना उत्पन्न असे आमिष लोकांना दाखविले. त्याबाबत कागदोपत्री करार करून हमी दिली. सुरुवातीला विश्‍वास संपादन करण्यासाठी पाच ते सहा महिने प्रतिमहिना परतावा दिला. लोकांचा विश्‍वास संपादन झाल्याचे समजताच गुप्ताने मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम घेऊन पोबारा केला असे पाेलिसांनी नमूद केले. 

त्यातूनच शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्‍क्‍यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत गुप्ताने कऱ्हाडच्या अमित आंबेकर व त्याचे मित्र सचिन वाघमारे यांच्याकडून वेगवेगळ्या बॅंक खात्यावर 19 लाख 87 हजार 500 रुपये मागवून घेऊन पळून गेला होता. त्यास शहर पोलिसांनी 27 जानेवारीला ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीत तपासात गुप्ताने सातारा, नगर, बीड व पुणे जिल्ह्यांतील लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामध्ये बीड येथील एसटी चालकाने कर्ज काढून पैसे गुंतवलेत, तर पुणे येथील एकाने वडिलांचे निवृत्तीनंतरचे फंडाचे पैसे गुंतवले होते. गुप्ताने 81 लोकांची सुमारे 13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. 

या पैशातून गुप्ताने ऐषआराम केल्याचे समोर येत आहे. या पैशातून बीएमडब्ल्यूसारख्या महागड्या गाड्या, फाईव्ह स्टार हॉटेलमधील राहणे, परदेश दौरे, विमान प्रवास, महागडे कपडे, घड्याळे अशा प्रकारे लोकांचा मिळवलेला पैसे ऐषआरामासाठी त्याने खर्च केला. पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांनी हा तपास केला.

प्रतीक्षा संपली! सरपंच निवडीसाठी विशेष सभा बाेलविण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''परळीतल्या गल्लीबोळातला स्टार प्रचारक...'', देशमुखांची धनंजय मुंडेंवर सडकून टीका

World AIDS Day 2025: 'ओरल सेक्स'मधूनही एचआयव्ही पसरू शकतो? AIDS संबंधीचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Thane Politics: मविआला धक्का! ठाकरे गटाची भाजपला साथ, राजकारणाचे समीकरण बदलले

Sanjay Raut : आजारपणानंतर संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर; महायुतीवर जोरदार टीका, काँग्रेसला लगावला टोला, प्रकृतीबाबतही दिली अपडेट

Viral Video: चार वर्षांच्या बालिकेला सेविकेची मारहाण, जमिनीवर आपटले अन्... व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

SCROLL FOR NEXT