सातारा

दुचाकी चोरीतील पलूसच्या तिघांना अटक; वाहनासाठी कऱ्हाड पोलिसांशी साधा संपर्क

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरासह मलकापूरमधील कृष्णा हॉस्पिटलसमोरून दुचाकी चोरणाऱ्या पलूस तालुक्‍यातील तिघांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कऱ्हाडमधून चोरून विकलेल्या 11 दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. प्रदीप तानाजी सोमोशी (वय 24, रा. अमनापूर रस्ता, पलूस), राजू तानाजी जाधव (23, भारती विद्यापीठाशेजारी, पलूस) व प्रशांत वसंतराव जाधव (35, सांडगेवाडी, पलूस) अशी संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर व परिसरातून अनेक दुचाकींची चोरी झाली आहे. त्याच्या तपासासाठी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. त्या पथकाकडून दुचाकी चोरांचा शोध सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संजय जाधव यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली, की पलूस येथील काहींनी कृष्णा हॉस्पिटल समोरून बऱ्याच दुचाकी चोरल्या आहेत. त्या चोरून विटा, खानापूर परिसरात विकल्या आहेत.

मोठी बातमी - दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; वाचा कधी होणार?

त्या माहितीच्या आधारे तपासासाठी पोलिस हवालदार जयसिंग राजगे, तानाजी शिंदे, मारुती लाटणे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. त्यांनी पलूस येथील चौघांनी कऱ्हाडातून चोरलेल्या दुचाकी बहे बोरगाव, आरग बेडग अशा विविध ठिकाणाही विकल्या आहेत. त्याची खात्री पटताच पोलिसांनी त्यातील संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी 11 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सहायक फौजदार सतीश जाधव, हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, सचिन साळुखे, तानाजी शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल मारुती लाटणे, विनोद माने, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव यांनी ही मोहीम फत्ते केली. दरम्यान जप्त केलेल्या दुचाकी मूळ मालकांना देण्यासाठी पाेलिस प्रयत्नशिल असून ज्यांच्या दुचाकी आहेत त्यांनी पाेलिस स्टेशनला संपर्क साधावा.

गुढी पाडव्याच्या खरेदीसाठी साता-यात नागरिकांची गर्दी; क-हाडात 30 व्यापा-यांवर कारवाई 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT