crime 
सातारा

हॉटस्पॉट कराडमध्ये रस्त्यावर वाढदिवस; 17 युवकांची उचलबांगडी, बेजबाबदारांना पालकांसमक्ष समज

हेमंत पवार

कराड (सातारा) : कोरोनाच्या काळातही कशाचेही भान न ठेवता रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्या व त्यासाठी दंगा करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या युवकांची येथील पोलिसांनी उचलबांगडी केली. वाढदिवासाचा जल्लोष करणाऱ्या 17 युवकांवर नुकतीच कारवाई केली. 

पोलिस उपाधीक्षक सुरज गुरव यांच्या नेतृत्वाखाली कारवाई झाली. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासह विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यावर पोलिसांनी त्या निमित्ताने अंकुश ठेवला आहे. पहिल्यापासून पोलिसांनी रस्त्यावर वाढदिवस करणाऱ्यांवर कारवाई करण्यास केली आहे. त्याबाबत पोलिसांकडे तक्रार आली की, कारवाई होत आहे. 

विद्यानगर येथे रस्त्यावर रात्री उशिरा वाढदिवस साजरा होत असल्याची माहिती पोलिस उपाधिक्षक गुरव यांना मिळाली. त्यांनी त्वरित याची दखल घेत पोलिसांना संबंधित युवकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने माहिती घेऊन दुसऱ्या दिवशी दुपारी वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांची उचलबांगडी करत कारवाई केली. बहुतांशी युवक अल्पवयीन असल्याने त्यांना समज देण्यात आली. परंतु असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT