Karad Railway Station sakal
सातारा

Karad Railway Station : कऱ्हाड रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

पुणे रेल्वे विभागातील १० स्थानके अमृत भारत स्टेशन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात विकसित होणार

हेमंत पवार

कऱ्हाड - अमृत भारत स्थानक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे रेल्वे विभागातील देहू रोड, चिंचवड, हडपसर, उरुळी, वाठार, लोणंद, सांगली, केडगाव, बारामती आणि कऱ्हाड स्थानकाचे अपग्रेडेशन आणि विभागातील विविध २५ ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज, रोड अंडर ब्रिज बांधण्याच्या कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांनी ही माहिती दिली.

श्रीमती दुबे यांनी स्थानकांवर विकसित करण्यात येणाऱ्या विविध प्रवासी सुविधांची या वेळी सविस्तर माहिती दिली. त्यांनी अमृत भारत स्थानक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे रेल्वे विभागातील देहू रोड, चिंचवड, हडपसर, उरुळी, वाठार, लोणंद, सांगली, केडगाव, बारामती आणि कऱ्हाड स्थानकाचे अपग्रेडेशन आणि विभागातील विविध २५ ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज, रोड अंडर ब्रिज बांधण्याच्या कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे.

२०४७ विकसित भारत विकसित रेल्वे चित्रकला स्पर्धेत मुलांनी काढलेली सुंदर आणि आकर्षक चित्रे देखील दाखवली. पुणे विभागांतर्गत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर निवड झालेल्या मुलांना २६ फेब्रुवारी रोजी अमृत भारत स्थानक योजना कार्यक्रमादरम्यान विविध स्थानकांवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT