Landslide esakal
सातारा

आगाशिव डोंगरातील दरड कोसळली; झुडपांत अडकल्यामुळे टळला अनर्थ!

डोंगरावर फिरायला गेलेल्या अनेकांनी पाहिली घटना

राजेंद्र ननावरेे

मलकापूर (सातारा) : आगाशिवनगर लेण्यांच्या परिसरामध्ये नुकतीच अचानक दरड (Landslide) कोसळली. काही अंतरावर येऊन दरड झुडपांमध्ये अडकली. दरड कोसळताना मोठा आवाज झाला. डोंगरावरती फिरायला गेलेल्यांनी प्रत्यक्ष ही घटना पाहिलीय. आगाशिवनगर झोपडपट्टीपासून काही अंतरावरील त्रिमूर्ती कॉलनीलगत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (Sahyadri Tiger Project) कार्यालयावरील बाजूस चूल वैल लेणीच्याजवळ ही घटना घडली. दरड कोसळताना आसपास कोणी नसल्याने व काही अंतरावर जाऊन दरड अडकल्याने पुढील अनर्थ टळला. चूल वैल परिसरातील दरड पडताना मोठा आवाज होऊन धूर निघाला.

आगाशिवनगर लेण्यांच्या परिसरामध्ये नुकतीच अचानक दरड (Landslide) कोसळली आहे.

वेगाने ही दरड खाली आली व काही अंतरावर थांबली. ही घटना डोंगरावर फिरायला गेलेल्या नागरिकांसमोर घडली. नागरिकांनी तातडीने डोंगरावरून काढता पाय घेतला. गेल्या आठवड्यातच पायथ्याशी असणाऱ्या झोपडपट्टीपासून ३०० फुटांवर दरड कोसळली होती. ही दरड काही अंतरावर जाऊन थांबल्याने मोठा अनर्थ टळला होता. येथील पालिकेने तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना पाहणी करण्याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान, अचानक दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दाट लोकवस्ती असलेल्या आगाशिवनगरच्या वरील बाजूस डोंगर खचल्याने अनेकांची भीतीने गाळण उडाली.

झोपडपट्टीपासून काही अंतरावर डोंगराईदेवीचे मंदिर आहे. हे मंदिर डोंगरपायथ्याजवळच आहे. गेल्या महिन्यात मंदिराच्या वरील बाजूने लेणी परिसरातूनच मोठा दगड येऊन मंदिराला धडकला. यामध्ये मंदिराचे किरकोळ नुकसान झाले आहे. मंदिराच्या घटनेमुळे झोपडपट्टीधारक स्वतःला नशिबवान समजत आहेत. कारण झोपडपट्टीलगत संरक्षक भिंत असल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या दगडांचा त्यांना कमी धोका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT