Shivsainik Agitation Sakal
सातारा

कऱ्हाड : रामदास कदमांविरोधात शिवसैनिक आक्रमक

ठाकरे कुटुंबीयांवर रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना कऱ्हाड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

हेमंत पवार

ठाकरे कुटुंबीयांवर रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना कऱ्हाड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

कऱ्हाड - ठाकरे कुटुंबीयांवर रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना कऱ्हाड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कदम यांच्या विरोधात निषेधाच्या व धिक्काराच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद-पाटील म्हणाले, 32 वर्षे आमदारकी, दहा वर्षे मंत्रीपद, चार वर्षे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाले असतानाही उपकाराची जाणीव न ठेवता खाल्ल्या मिठाला न जागता चोराच्या उलट्या बोंबा रामदास कदम यांच्याकडुन सुरू आहेत. येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक व जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेना कऱ्हाड तालुका, शहर व जिल्ह्याच्यावतीने आम्ही त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत. महिला आघाडी जिल्हा संघटिका अनिता जाधव यांनी धिक्कार करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

दक्षिण तालुका प्रमुख शशिकांत हापसे, मलकापूर शहर प्रमुख मधुकर शेलार, युवा सेना शहर संघटक अक्षय गवळी, उप तालुका प्रमुख दिलीप यादव, शहाजीराव जाधव, संजय चव्हाण, माणिक आथरकर, ऋषिकेश महाडिक, युवा सेनेचे उपतालुकाप्रमुख संदीप पाटील, महिला आघाडीच्या कविता यादव, शोभा लोहार, प्रेमलता माने, प्रतिभा नाईक, विभाग प्रमुख महेश पाटील, प्रवीण लोहार अनिल चाळके महेश भावके, ओमकार काशीद पाटील, बापू भिसे ,कृष्णात बोडरे, विद्यानंद पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT