Crime esakal
सातारा

Karad Crime : सुनेच्या आत्महत्येमुळे सासूनेही हाताच्या नसा कापल्या

सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याचा धक्का सहन न झाल्याने सासूने हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्याचा धक्का सहन न झाल्याने सासूने हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विंग येथे आज ही घटना उघडकीस आली. नीलम अनिकेत माने (वय २१, रा. विंग) असे आत्महत्या केलेल्या सुनेचे नाव आहे. राणी अंकुश माने असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सासूचे नाव आहे.

मयत नीलम माने यांच्या संतप्त नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सासरच्या दारात अंत्यविधी करण्याची मागणी केल्याने तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात तणावाचे वातावरण झाले होते. तालुका पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील नीलम हिचे तीन महिन्यांपूर्वी अनिकेत माने याच्याशी लग्न झाले होते. नीलम माने ही स्वयंपाकघरात झोपली होती. तर पती अनिकेत अंकुश माने, सासू राणी माने व सासरा अंकुश श्रीपती माने (वय ४७) हे सर्व जण बाहेर झोपले होते.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना पाहून सासूने दोन्ही हातांच्या नसा कापून आमहत्येचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयत नीलम माने हिचे आई, वडील, भाऊ व संतप्त नातेवाइकांनी तालुका पोलिस स्टेशन व उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती.

सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी

नीलमच्या मृतदेहावर तिच्या सासरच्या दारात अंत्यसंस्कार करण्याची मागणी नातेवाइकांनी केली. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT