Grampanchyat Election Result sakal
सातारा

Grampanchyat Election Result : कराडला आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व; काँग्रेसकडे तीन तर भाजपाकडे एक ग्रामपंचायत

कराड (जि सातारा )तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली.

- हेमंत पवार

कराड - कराड (जि सातारा )तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. बारापैकी आठ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. कराड दक्षिण मधील तीन ग्रामपंचायत काँग्रेसने यश मिळवले. भाजपला केवळ एक ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे.

कराड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींची मतमोजणी सोमवारी सकाळी प्रशासकीय इमारतीत सुरू झाली. यावेळी कराड उत्तर मधील सर्वच ग्रामपंचायतींवर आमदार बाळासाहेब पाटील समर्थक राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले.

तर कराड दक्षिणेतील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे तर भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी रेठरेबुद्रुक येथील भाजपाचे सत्ता कायम ठेवत सर्वच अठरा जागांवर विजयी मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT