सातारा

मार्निंग वॉकला चाललेल्या मुलींवर सातारा जिल्ह्यात हल्ला

जगन्नाथ माळी

उंडाळे (जि. सातारा) : मार्निंग वॉकला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अनोळखी दुचाकीस्वाराने धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात एक मुलगी जखमी झाली. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तुळसण (ता. कऱ्हाड) येथे ही घटना नुकतीच घडली. या प्रकाराने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
 
संबंधित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले, की तुळसण येथील दोन मुली सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. या दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. त्यातील एक 16 वर्षांची, तर तिची लहान बहीण 12 वर्षांची आहे. दोघी बहिणी पहाटे पाच वाजता तुळसणकडून कोळेवाडी खिंडीकडे मॉर्निंग वॉकला निघाल्या होत्या. त्या वेळी गावापासून निर्मनुष्य रस्त्यावर तुळसणकडून दुचाकीवरून भरधाव आलेल्या व्यक्तीने मागून त्या दोन्ही मुलींवर धारदार शस्त्राने हल्ला केला.

कऱ्हाडकरांनाे! आता तुमच्याच हातात पालिकेच्या तिजाेरीची जबाबदारी  

त्यात 16 वर्षांच्या मुलीच्या हाताला दुखापत झाली. तिला तातडीने उपचारासाठी कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर हल्लेखोर कोळेवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाला. घटनेच्या वेळी तेथे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अन्य ग्रामस्थांनी संबंधिताला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. या घटनेची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT