कऱ्हाड sakal
सातारा

कऱ्हाड : फ्लेक्स जाहिरात कर आकारणीचे धोरण दुर्लक्षित

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची डावलली सूचना

सचिन शिंदे / जालिंदर सत्रे

कऱ्हाड : जाहिरात फ्लेक्सच्या कर आकारणीचे धोरण आखण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह आदेश देवून वर्ष उलटले तरीही नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पालिकेच्या २०२१ च्या अर्थसंकल्पात तरतूद निर्देश होते. मात्र, त्यावर काहीच काम झाले नाही. यंदाच्याही अर्थसंकल्पात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जाहिरात फ्लेक्सच्या कराचे धोरण अपूर्णच आहे. पालिकेला उत्पन्न मिळवून देणाऱ्या बाजूकडे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेचा लाखोंचा महसूल बुडत आहे.

फ्लेक्सवरील कारवाईला राजकीय खो मिळत असल्याची चर्चा असली तरी सध्या प्रशासकांच्या काळात तरी तो प्रश्न निकाली लागण्याची अपेक्षा आहे. मात्र, तेही होताना दिसत नाही. पालिकेचा कर चुकविण्याची सवय लागेलल्या फ्लेक्सधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे. त्यांचे जाहिरात लाखोत अन् पालिकेला त्यांच्याकडून कर आखराणी शेकड्यात असे विदारक चित्र आहे. फ्लेक्सधारकांची मन मानेल तशी आकारणी वर्षानुवर्षे सुरूच आहे, तरीही ते कर भरत नाहीत. जिल्ह्यातही हीच स्थिती लक्षात आल्याने कर वसुलीचे पालिकांनी योग्य धोरण ठरवावे, असे जिल्हाधिकारी सिंह यांनी आदेश दिले.

कऱ्हाड पालिकेचा मागील वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर करताना जिल्हाधिकाऱ्यांनी फ्लेक्सच्या वसुलीचे आदेश दिले होते. थकीत वसुली न झाल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र, तरीही पालिकेचे त्याकडे दुर्लक्ष आहे. कर थकीतचा आकडा वाढल्याने पालिकेचे लाखोंचे उत्पन्न बुडते आहे. फ्लेक्स बंदी असतानाही शहरात वाढणाऱ्या फ्लेक्सकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. हे दुर्लक्ष शहराच्या सौंदर्यीकरणाला घातक आहे. पालिकेने मोठी मोहीम राबवून सार्वजनिक जागा फ्लेक्स व जाहिरातमुक्त केल्या. मात्र, आता पुन्हा फ्लेक्समुक्त झालेला बस स्थानक परिसरात फ्लेक्स वाढत आहेत. अद्यापही खासगी ठिकाणचे फ्लेक्स, जाहिरात होर्डिंग्‍ज आहेत. त्यावरील कारवाईत चालढकल होत आहे. फ्लेक्सधारक कागदपत्रे, अटी नियम पाळत नाहीत. त्यांची कर आकारणीही थकीत आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने कर बुडवेगिरी वाढली आहे.

विनापरवाना फ्लेक्सवर कारवाईची गरज

पालिकेच्या माहितीनुसार शहरात १३ फ्लेक्सला परवानगी आहे, उर्वरित मोठे फ्लेक्स विनापरवानाच आहेत. पालिकेची कोणतीही परवानगी त्यांना नाही, पालिकेचा कर भरत नाहीत. पालिका तीन ते पाच रुपये स्वेअर फुटाने (जुना दर) पैसे आकारते, तरीही फ्लेक्सधारकांचा कर लाखोंत थकीत आहे. तेच फ्लेक्सधारक जाहिरात देणाऱ्यांकडून प्रति स्क्वेअर सेंटीमीटरप्रमाणे कित्येत जादा पटीने जाहिरातींचे पेसे घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात अटक

Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT