Satara Sakal
सातारा

कऱ्हाड-पुणे थेट एसटी बससेवा

सोमवारपासुन कार्यवाही, प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी विनाथांबा सेवा

- हेमंत पवार

कऱ्हाड : कऱ्हाडमधील प्रवाशांना पुणे (Pune) येथे जाण्यासाठी कोल्हापुर (Kolhapur), सांगली (Sangali), कोकणासह (Kokan) कर्नाटकातुन आलेल्या एसटी बसने जावे लागते. त्या एसटी बस नाष्टा, जेवणासाठी सातार-पुणे दरम्यान थांबतात. त्यामुळे कऱ्हाडमध्ये (Karhad) बसलेल्या प्रवाशांची नाहक वेळ वाया जातो. नेमकी हीच बाब विचारात घेवुन कऱ्हाडवरुन पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी कऱ्हाड-पुणे ही विनाथांबा बससेवा सोमवारपासुन सुरु करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य असलेल्या एसटीच्या सेवेची कोरोनामुळे घडी विस्कटली आहे. लॉकडाऊन शिथील होईल तशी ही विस्टकलेली घडी पुर्वपदावर आणण्यासाठी एसटीने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत आता नवीन एसटीच्या सेवा सुरु करण्यास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड आगार प्रमुख विजयराव मोरे यांनी ज्या मार्गावरुन उत्पन्न मिळणार आहे, त्या मार्गांवर तातडीने फेऱ्या सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर अन्य फेऱ्याही सुर करण्यासाठीही उपलब्ध मनुष्यबळ, एसटीबसची संख्या यांचा विचार करुन प्रयत्न सुरु आहेत. कऱ्हाडमधील प्रवाशांना पुणे येथे जाण्यासाठी कोल्हापुर, सांगली, कोकणासह कर्नाटकातुन आलेल्या एसटी बसने जावे लागते. त्या एसटी बस नाष्टा, जेवणासाठी सातारा-पुणे दरम्यान थांबतात. त्यामुळे कऱ्हाडमध्ये बसलेल्या प्रवाशांची नाहक वेळ वाया जातो. याचा विचार करुन कऱ्हाडवरुन पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचावा यासाठी कऱ्हाड-पुणे ही बससेवा सोमवारपासुन सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कऱ्हाडच्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

कऱ्हाड एसटी आगारामार्फत प्रवाशांचा वेळ वाचावा आणि त्यांना कऱ्हाडवरुन थेट पुण्याला एसटीबस मिळावी यासाठी कऱ्हाड-पुणे ही एसटीबसेवा सोमवारपासुन सुरु करत आहोत. त्याचा प्रवाशांना नक्कीच फायदा होईल.

- विजयराव मोरे (एसटी आगार व्यवस्थापक, कऱ्हाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT