satara sakal
सातारा

कऱ्हाड : जलजीवन मिशनचा उपयोग काय?

कऱ्हाड पंचायत समिती सभेत सदस्यांचा सवाल; प्रश्न मार्गी लावण्याची सभापतींची ग्वाही

- हेमंत पवार

कऱ्हाड : तालुक्यातील अनेक गावांत पाणी योजनेचे नळ कनेक्शन राजकारणामुळे काही जणांना दिले जात नाही. केंद्र व राज्य शासनाचे प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याचे धोरण असेल आणि नळ कनेक्शन मिळत नसेल तर त्या जलजीवन पाणी योजनांचा उपयोग तरी काय? असा सवाल पंचायत समिती सदस्य सुहास बोराटे यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती प्रणव ताटे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी अशा वंचित कनेक्शनधारकांची तपासणी करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

पाणीपुरवठा विभागाचा आढावा उपअभियंता यांनी दिला. त्याचदरम्यान बोराटे यांनी संबंधित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर सभापती, गटविकास अधिकाऱ्यांनी तशी माहिती दिल्यास संबंधितांचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या आढाव्यावेळी प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्यापासून वंचित वस्त्यांचा शोध घेऊन, घर तेथे नळकनेक्शन मिळेल, यासाठी ग्रामसेवकांची मीटिंग बोलावण्यात येईल, त्याची कार्यवाही आठवड्यात करू, अशी ग्वाही उपसभापती देशमुख यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाचा आढावा देताना सदस्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या योजना केव्हा राबवल्या जातात, याबाबत सदस्यांना कळवले जात नाही. पशुसंवर्धन विभागात नेमके काय चाललेय हेच आम्हाला समजत नाही. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

अगोदर योजना राबवायची मग सदस्यांना सांगायचे? असेच वारंवार घडत आहे. या प्रकारामुळे पशुसंवर्धन विभाग पंचायत समितीचाच आहे का? असा सवाल खुद्द सभापती ताटे यांनीच उपस्थित केला. त्यावर अधिकाऱ्यांनी नुकतेच लसीकरण सुरू झाल्याचे सांगत कार्यक्रमांना त्या विभागातील सदस्यांना बोलविण्याची सूचना सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना करू, असा खुलासा केला. आरोग्य विभागाचा आढावा डॉ. सुनील कोरबू यांनी दिला. या वेळी तालुक्यातील गावनिहाय पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणी आरोग्य विभागाने वेळेत व काटेकोर करावी, अशी सूचना उपसभापती देशमुख यांनी केली. दरम्यान, आशांना पाच महिन्यांपासून मानधन नाही, त्याची कार्यवाही तातडीने करावी, अशीही सूचना उपसभापती देशमुख यांनी केली.

लेटरपॅड कोणाला विचारून बदलले?

पंचायत समितीचे लेटरपॅडमध्ये करण्यात आलेल्या बदलावर सदस्य रमेश देशमुख यांनी आक्षेप घेऊन ते कोणाला विचारून बदलले असा सवाल उपस्थित केला. त्यांनी जुने आणि नवीन लेटरपॅड सभागृहात दाखवून त्याची पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यावर गटविकास अधिकारी यांनी सभेचे नोटीस कोणी दिले याची उल्लेख असावा, यासाठी मी माझे नाव टाकले आहे, असा खुलासा केला. त्यानंतर पूर्वी होते त्याप्रमाणेच लेटरपॅड करावे, अशी सूचना करण्यात आली. त्यावर गटविकास अधिकाऱ्यांनी पहिल्याप्रमाणे ते करण्यात येईल, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंशी संवाद साधण्यास उत्सुक; जपानविरुद्ध ऐतिहासिक टी-२० सामन्याचीही उत्सुकता

ED Raid Karnataka: जारकीहोळींच्या घरी ‘सार्वजनिक’ची कागदपत्रे अन् लाखोंचे परदेशी चलन; ईडीच्या छाप्यात काय काय आढळलं?

बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : खंबाटकी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक सुरू; एकेरी मार्गामुळे आज वाहनांची मोठी कोंडी

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT