सातारा

देशात प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या कऱ्हाड पालिकेला कर्जत, नगर जिल्ह्यातील पथकांची भेट

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड नगरपालिकेने देशात लौकीक मिळवला आहे. पालिकेने लोकांनाही सोबत घेवून उभा केलेले प्रकल्प राज्यात पथदर्शी आहेत, असे मत कर्जतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केले. कर्जतच्या नगरपंचायतीच्या पथकाने येथे भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

देशात एक लाख लोकसंख्येच्या पालिकांमध्ये प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या कऱ्हाड पालिकेने अनेक प्रकल्प उभा केले आहेत. त्या विविध प्रकल्पांना राज्यभरातून पदाधिकारी भेट देत आहेत. पालिकेने तयार केलेल्या घनकचरा प्रकल्पाला वसुंधरा पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. त्या प्रकल्पाला कर्जत नगरपंचायतीसह नगर जिल्ह्यातील पथकाने आज भेट देवून माहिती घेतली. त्यांनी असा प्रकल्प आपल्या भागात राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी येथील मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपअभियंता आर. डी. भालदार, ए. आर, पवार, मिलिंद शिंदे, मारुती काटरे उपस्थित होते. नगर जिल्हा पथकासोबत कर्जत नगरपंचायतीची टीमही सोबत होती. कर्जतचे मुख्याधिकारी श्री. जाधव यांनी येथे पाहाणी केली. त्यांनी कर्जतलाही असा प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. पालिकेने तयार केलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची सगळी माहिती घेवून त्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पास भेट दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Shravan Month 2025 Fasting Benefits: श्रावणातील उपवासामुळे मिळते शरीराला नैसर्गिक डिटॉक्स, जाणून घ्या फायदे

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

SCROLL FOR NEXT