Udayanraje Bhosale esakal
सातारा

कास धरणाच्या 'उंची'ला 5 जूनची डेडलाइन; खासदार उदयनराजेंकडून चोख आदेश

कास धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला वन विभागाने काही वर्षांपूर्वीच मान्यता दिलीय.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कास धरणाची (Kas Dam) उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला वन विभागाने काही वर्षांपूर्वीच मान्यता दिलीय. विभागाने त्यासाठी जागा हस्तांतरण करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामांत आलेले सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि येथील काम जोमात सुरु असले तरी काहीअंशी काम रखडताना दिसत आहे. सातारा शहरासह कास परिसरातील 21 गावांसाठी कास धरणाच्या उंचीचे काम वेळेत होणे आवश्यक असून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी नुकतीच कास धरणाच्या उंचीच्या कामाची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी हे काम येणारा पावसाळा विचारात घेवून ५ जूनपूर्वी झाले पाहिजे, अशी डेडलाइन जलसंपदा विभागाचे अधिकारी मोमीन व त्यांच्या सहकाऱ्यांना देत लागणाऱ्या निधीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (Kas Dam Was Inspected By MP Udayanraje Bhosale Satara News)

कास धरणाच्या उंचीच्या पाहणीप्रसंगी खासदार उदयनराजेंनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ॲड. दत्ता बनकर यांच्यासह इरिगेशनचे अभियंता मिसाळ उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, पावसाळ्याचे दिवस गृहीत धरुन कासची उंची वाढविण्याचे काम अधिक गतीमान करण्यात यावे. यासाठी जी काही लागणारी मशिनरी आहे. ती दिली जाईल, शिवाय हे काम येत्या पावसाळ्यापूर्वी म्हणजे ५ जूनपर्यंत करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, या कासधरणाच्या उंचीचे काम पूर्ण झाल्यानंतर कास, बामणोली, तेटली, अनावळे, पेट्री, मुनावळे, बनकरवाडी, हटाईचीवस्ती, जांभुळमुरा आदी 21 गावांसाठी या कासचे पाणी सातारा शहरासह महत्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने हे काम आता गतीने होणे गरजेचे आहे. त्यामुळे या धरणक्षेत्राची पाहणी खासदार उदयनराजेंनी करुन संबंधितांना काम जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या आहे. यामुळे येत्या काही दिवसांत हे काम लवकरात-लवकर सुरु होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कास धरणाचे काम अंतिम टप्प्यात?

कास धरण हे 1 टीएमसीला कमी म्हणजे 0.075 दश अब्ज घनफूट आहे. येथे 12 मीटर उंचीच्या सांडव्याचे काम सुरु असून याची मूळ कल्पना 2009 मध्ये कास धरण उंचीचा विषयावरुन ऐरणीवर आली. त्यानंतर 2012 मध्ये फाईनल होवून यासाठी 95 कोटीच बजेट करुन या कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. या कास धरणाचे काम आता 15 टक्के बाकी आहे. यासाठी लागणारा निधीही आता उपलब्ध झाल्यामुळे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Kas Dam Was Inspected By MP Udayanraje Bhosale Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT