सातारा

आचारसंहितेचे बंधन असल्याने त्याविषयी बोलता येणार नाही : जयंत पाटील

पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातील जलसंधारणाची, तसेच कवठे- केंजळ या योजनेसह मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केलेली सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. आचारसंहितेचे बंधन असल्याने आज याबाबत काही बोलता येत नाही; परंतु आचारसंहिता संपताच ही सर्व कामे निश्‍चितच पूर्ण केली जातील, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
 
जोशीविहीर (ता. वाई) येथील आरती मंगल कार्यालयात ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ यांनी आयोजिलेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार मकरंद पाटील, मुंबईच्या महापालिकेच्या नगरसेविका भारती पिसाळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, प्रतापराव पवार, शशिकांत पिसाळ, नितीन पाटील, प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, दिलीप बाबर, शशिकांत पवार, अजित पिसाळ, आबासाहेब यादव, अतुल पिसाळ आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटलांना आता विश्रांती गरज; जयंत पाटलांचा टाेला 
 
मंत्री पाटील म्हणाले, ""मी आज आमदार मकरंद पाटील यांच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. लक्ष्मणराव पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत मकरंद आबांनी या मतदारसंघात कामे सुरू केली आहेत. जिल्ह्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भरभरून प्रेम केले असून, त्याची उतराई होणे अशक्‍य असले, तरी विकासकामांच्या रूपातून आम्ही उतराई होण्याचा प्रयत्न करू.''

फास्टॅगच्या बंधनावर तासवडे, आनेवाडीत उसळणार विराेधाची लाट? 

या वेळी आमदार पाटील म्हणाले, ""मतदारसंघातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्‍यातील सिंचन प्रकल्प, कॅनॉल, सोळशी प्रकल्प आदी अनेक कामे तातडीने पूर्ण व्हावीत.'' धनंजय पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. महादेव मस्कर यांनी आभार मानले.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केडीएमसीमध्ये शिंदेसेना-मनसेची जवळीक! श्रीकांत शिंदे आणि राजू पाटलांची यांची भेट; पडद्यामागे काय घडलं?

Fuel Crisis: पेट्रोलवर कोटा लागणार? भारतात इंधन रेशनिंगची चर्चा; तुमच्या गाडीला किती लिटर इंधन मिळणार? आठवड्याला फक्त…?

कोणताही शेतकरी स्वखुशीने माल टाकून देत नाही... प्रवीण तरडेंनी सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाले, 'लोक म्हणतात शेतकरी माजलाय...

Pune Crime : कौटुंबिक वादातून सुनेकडून सासूचा खून; सुनेला अटक

Latest Marathi News Live Update : दुर्गम भागातील आरोग्यसेवेला बळ देण्यासाठी आमदार पाडवींकडून 5 रुग्णवाहिकांचे लोकार्पण

SCROLL FOR NEXT