सातारा

पोलिस ठाण्यासमोरील वडाच्या झाडावर कार आदळली; पुण्यातील चिमुकली ठार

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : पाचगणीहून पुण्याकडे जाताना चारचाकी गाडी पोलिस ठाण्याच्या समोरील वडाच्या झाडावर आदळल्याने दीड वर्षाचे चिमुकलीचा मृत्यू झाला. अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. 

पाचगणीतील डॉ. अभय श्रीहरी देशपांडे (वय 56) यांची पुतणी आदिती मयूर कोटस्थाने (वय 35) जावई मयूर त्रिंबक कोटस्थाने (वय 40), मृण्मयी मयूर कोटस्थाने (वय 12) व शरण्या मयूर कोटस्थाने (वय दीड वर्षे) (सर्व रा. अजिंक्‍यतारा हाउसिंग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक, पुणे) हे सर्व जण मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास पाचगणीतून पुण्याला जाताना पाचगणी पोलिस ठाण्यासमोर वडाच्या झाडावर कार आदळली. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बेल एअरमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील शरण्याचा मृत झाला. पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार तपास करीत आहेत. 

दरम्यान दांडेघर येथील हॉटेलमध्ये काल (ता. 8) रात्री जुन्या वादावादीतून तुंबळ मारामारी झाली. पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दांडेघर येथील झोस्टेल हॉटेलमध्ये रात्री दीड वाजता फिर्यादी प्रतीक अंकुश तावरे (वय 32, रा. नाना पेठ, पुणे) यांची चेतन पाटील यांच्यासह दोन कामगारांशी (सर्व रा. दांडेघर) जुन्या वादातून बाचाबाची झाली.

त्यावेळी तिघांनी टेबल-खुर्ची व बियरच्या बाटलीने तसेच लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यात प्रतीक यांच्या डोक्‍यास दुखापत झाली. सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रसाळ तपास करीत आहेत. 

छत्तीसगडच्या राष्ट्रीय स्पर्धेत माणच्या भावा-बहिणीची सुवर्ण कामगिरी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT