kiraksal first village to celebrate international wolf day forest officer mahesh zanjurne satara sakal
सातारा

Satara News : 'देशात जागतिक लांडगा दिन साजरा करणारे किरकसाल एकमेव गाव'...

नष्ट होत चाललेल्या लांडग्याच्या प्रजातींचे संरक्षण करणे काळाची गरज असून याकामी किरकसालने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद

फिरोज तांबोळी

गोंदवले : नष्ट होत चाललेल्या लांडग्याच्या प्रजातींचे संरक्षण करणे काळाची गरज असून याकामी किरकसालने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. किरकसालला लवकरच जैवविविधता संरक्षण व संवर्धन गाव म्हणून जागतिक दर्जा मिळेल असा विश्वास सहाय्यक वनरक्षक महेश झांजुर्णे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात पहिल्यादा जागतिक लांडगादिन साजरा करणाऱ्या किरकसालमध्ये यंदा देशातील एकमेव लांडगा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे उपस्थित होते.

यावेळी भारतीय युवा जैवविविधता नेटवर्कच्या राष्ट्रीय समन्वयक पाखी दास,दहिवडी वनपरिक्षेत्र अधिकारी दहिवडी अमित मुळीक,कोरेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव घार्गे,सरपंच शोभा चव्हाण,जैवविविधता समितीचे अध्यक्ष अमोल काटकर,पक्षीमित्र डॉ प्रवीण चव्हाण, वन्यजीव अभ्यासक अनिल बनसोडे,अभिजित माने, प्रथमेश काटकर,विशाल काटकर आदी मान्यवर  उपस्थित होते.

जागतिक लांडगा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच किरकसाल परिसरातील जैवविविधतेवर आधारित ध्वनीचित्रफितही दाखवण्यात आली.

याशिवाय किरकसालच्या जैवविविधता बाबतच्या कामात पुढाकार असलेल्या वन्यजीव अभ्यासक चिन्मय सावंत यांनीही डेहराडून येथून ध्वनिचित्रफितीद्वारे संपर्क साधून सहभाग नोंदवला.

महेश झांजुर्णे म्हणाले,वन्यप्राण्यांबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजुती आहेत.लांडगा हा प्राणी तर अन्नसाखळीतील महत्वाचा प्राणी आहे.मात्र लोक त्याला शत्रू समजतात.किरकसालमध्ये मात्र वन्यजीवांना संरक्षण देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची बाब खूप मोलाची आहे.वन विभागाकडून या कामाला नेहमीच सहकार्य राहील.

पाखी दास म्हणाल्या,युवा पिढीला सोबत घेऊन आम्ही जैवविविधतेबाबत सकारात्मक प्रयत्न करत आहोत.किरकसालमध्ये अशा युवकांची टीम तयार असल्याने या भागात वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी चांगला वाव आहे.म्हणूनच भारतीय युवा जैवविविधता नेटवर्कच्या माध्यमातून सध्या चार लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.आगामी काळातही या कामासाठी मदत करू.

अनिल बनसोडे,डॉ प्रवीण चव्हाण यांचीही मनोगते झाली.दरम्यान कार्यक्रमानंतर उपस्थितांनी वनभ्रमंती करून वनभोजनाचा आस्वाद घेतला. जागतिक लांडगा दिन महाराष्ट्रात पहिल्यांदा साजरा करणाऱ्या किरकसाल गावात ही परंपरा अखंडित सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत लोक प्रयत्न करत असल्याने हे गाव वन्य पर्यटनासाठीचे खास आकर्षण बनू पाहत आहे.वन विभागासह वन्यप्रेमींनी मार्गदर्शन व सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT