सातारा

कृषी कायद्याविरोधात 'किसान' आक्रमक; साताऱ्यात धरणे

प्रशांत घाडगे

सातारा : शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान संघर्ष समन्वयच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले. 

याप्रसंगी कामगार शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा, बळीराजा शेतकरी संघटना, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारे कायदे मंजूर केले आहेत. या कायद्याविरोधात पंजाब, हरियाना व इतर काही ठिकाणांहून लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कायदा तयार करून देशातील सर्व शेतकरी व शेतमाल उत्पादकांचे खासगीकरण होऊन बाजार समिती यंत्रणा संपण्याचा धोका आहे. रेशनवरील अन्नधान्य व स्थानिक बाजारपेठांमधून उपलब्ध होणाऱ्या शेतमालास अडचण होणार आहे. 

यासंदर्भात सरकारबरोबर चर्चा करूनही शेतकरीविरोधी कायदा केला आहे. या कायद्याविरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरूनही सरकारने आंदोलनाची दखल न घेता शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. चर्चा न करता आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्न केला आहे. यासाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्याच्या समर्थनार्थ धरणे धरल्याचे किसान संघर्ष समन्वय संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT