सातारा

भुईंज : उसाचे क्षेत्र वाढले; गाळपासाठी होणार कारखान्यांची दमछाक

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : एक ते दीड महिन्यापासून सर्वच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम वेगात सुरू आहेत. गत दोन वर्षांपासून वाढलेले उसाचे क्षेत्र आणि कारखान्यांकडे असणारी अपुरी तोडणी यंत्रणा यामुळे संपूर्ण उसाचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक होणार आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी आतापासूनच कारखान्यांनी नियोजन करण्याची आवश्‍यकता आहे.
 
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असून किसन वीर खंडाळा कारखान्याचा बॉयलर नुकताच पेटला आहे. किसन वीर सातारा, किसन वीर खंडाळा आणि प्रतापगड सहकारी साखर कारखाना या तिन्ही मिळून कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदाच्या गळीत हंगामासाठी सुमारे 14 हजार 35 हेक्‍टर ऊस उभा आहे. त्यापैकी पूर्वहंगामी उसाची 3 हजार 494 हेक्‍टर, हंगामी (सुरुची) उसाची 2 हजार 284 हेक्‍टर, आडसाली 3400 हेक्‍टर तर खोडवा उसाची 4 हजार 854 हेक्‍टर उसाची नोंद आहे. या सर्व ऊस तोडणीसाठी 90 बैलगाड्या, 210 टॅक्‍टर, 20 ट्रक, 65 टॅक्‍टर ट्रॉली, 22 हार्वेस्टर मशिन एवढी यत्रंणा आहे. सध्या "किसन वीर'मध्ये दररोज 4,500 मेट्रिक टन उसाचे गाळप होत असून खंडाळा कारखान्याचा बॉयलर नुकताच पेटला आहे. अजून मोळी टाकून हंगाम सुरू होण्यास कालावधी जाणार आहे, तर प्रतापगड सहकारी कारखाना अजूनही बंद आहे.

दे त्यांना काय पाहिजे ते! कार्यकर्त्यांसाठी पुढा-यांचे ढाब्यावर वाढले फाेन
 
"किसन वीर'चा हंगाम उशिरा सुरू झाल्याने काही मशिन मालकांनी ऊस तोडणीसाठी इतर कारखान्यांकडे धाव घेतली असून त्या पैकी काही हार्वेस्टर मशिन पंजाब येथे, तर काही मशिन उस्मानाबाद येथे ऊसतोडणी करीत आहेत. त्यामुळे या कारखाना क्षेत्रात असलेल्या तोडणी यंत्रणेवर ताण येत आहे. 

कारखानदारांसाठी धोक्‍याची घंटा
 
साखर कारखाने आर्थिक अडचणीत येण्यामागे उसाची एफआरपी व साखरेची एमएसपी यामधील दरी हेच प्रमुख कारण आहे. गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रीय व राज्य सहकारी साखर संघाकडून केंद्र सरकारपुढे सातत्याने ही मागणी ठेवण्यात आली आहे. साखरेचा प्रति किलो उत्पादन खर्च 35 रुपये व विक्री 31 रुपये आहे. या स्थितीमुळे साखर कारखानदारांपुढे धोक्‍याची स्थिती निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

Land Acquisition: शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! भूसंपादनापूर्वी पोटहिस्सा निश्चित होणार, प्रत्यक्ष वहिवाटीनुसार मिळणार मोबदला

Rahul Gandhi: ‘मोदी-शहांना आम्ही वेडे करून सोडू’; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आरएसएसचे कॉर्पोरेटायझेशन झाले..

शासनाची भन्नाट योजना! ३ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गरजूंना आता न्यायालयातील केससाठी मिळणार मोफत वकील; जन्मदाखला काढण्यासाठीही विनाशुल्क मदत, वाचा....

आजचे राशिभविष्य - 14 ऑगस्ट 2026

SCROLL FOR NEXT