सातारा

टोमॅटोचे गाव म्हणून कोपर्डे हवेलीची बनू लागली ओळख

जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : येथील व परिसरातील शेतकरी गेल्या 25 वर्षांपासून टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. ऊस पट्ट्यातील परिसर टोमॅटो लागवडीत देखील अग्रेसर आहे. दराची लॉटरी लागली तर मालामाल नाहीतर कंगाल असे असतानाही पूर्वीच्या तुलनेत अलीकडे टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढतच चालले आहे.
 
उन्हाळी हंगामात दर चांगला मिळतो म्हणून या हंगामात टोमॅटोची लागण मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे कोपर्डे हवेली परिसराची ओळख टोमॅटोचे आगर अशी बनत आहे. उन्हाळी हंगामात 15 मार्चपासून सुरू होणारी लागण 15 एप्रिलपर्यंत चालते.

काळानुसार नवीन नवीन प्रयोग शेतकरी करत आहेत. टोमॅटोच्या उत्पादन खर्चातही वाढ होत चालली आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च सुमारे दोन लाखांच्या घरात आहे. वाशी, अहमदाबाद, चिपळूण, बेळगाव, पुण्यासह लोकल बाजारपेठत टोमॅटोची विक्री केली जाते. कोपर्डे हवेली परिसरात कोपर्डे हवेली, पार्ले, बनवडी, वडोली निळेश्वर, उत्तर कोपर्डे, नडशी, शिरवडे, शहापूर आदी गावांतील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. उत्पादन खर्चात वाढ, दरातील चढ-उतार, गारपीट, अवकाळी, तापमान वाढ, किडीचा प्रादुर्भाव, फूल गळती व वेगवेगळे व्हायरस यांसह अनेक संकटांचा सामना बाग वाचवण्यासाठी करावा लागतो. 

टोमॅटोची लागवडीचे व्यसनच आम्हाला लागले आहे. 25 वर्षांपूर्वी वडिलांसोबत मी टोमॅटो लागवडीस सुरुवात केली. तेव्हापासून उत्पादन घेत आहे. यंदा चांगल्या दराच्या आशेने बाग चांगली आणली आहे. 

- दादासाहेब चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT