सातारा

कोपर्डे हवेलीतील 'बाप्पा'ची स्थापना यंदा मंदिरात, मंडळांचा 'हा' निर्णय

जयंत पाटील

कोपर्डे हवेली (जि.सातारा)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीमध्ये गणेश मंडळांच्या झालेल्या बैठकीत यंदाचा गणेशोत्सव हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचा निर्णय झाला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, माजी उपसरपंच नेताजी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी एस. टी. लाटे, महादेव चव्हाण, बाळासाहेब पाटील, उत्तम चव्हाण, मोहन चव्हाण, आबासाहेब चव्हाण, राजेंद्र चव्हाण, शिवाजी चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, भीमराव चव्हाण, सोपान चव्हाण, राजेंद्र पाटील, ग्रामस्थ व गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
साताऱ्याचे जिल्हाधिकारी बनले कठाेर, अखेर हा निर्णय घेतलाच 
 
कोपर्डे हवेलीत सुमारे वीस ते 25 गणेश मंडळे आहेत. गावात प्रत्येक वर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंडळाच्या वतीने विविध देखावे सादर केले जातात. गणेशोत्सव काळात गावासह परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात देखावे पाहण्यासाठी येतात. यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्रित येऊन मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर गावातील गणपती मंदिरात गणपती बसविण्यात येणार असून, त्याची पूजा पुजारी करणार आहेत.

बकरी ईद : प्रांताधिकाऱ्यांच्या आवाहनास मुस्लिम समाजाचे पाठबळ

ब्युटीपार्लर व्यावसायिकांना हवी 15 हजार भरपाई, प्रांतांकडे साकडे 

या वेळी हिंदुराव चव्हाण, नेताजी चव्हाण, शिवाजी लाटे, शिवाजी चव्हाण, भीमराव चव्हाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला. कोपर्डे हवेली गावाचा आदर्श इतर गावांनी घेतल्यास प्रशासनावरील खूप मोठा तान कमी होण्यास मदत होणार आहे. 

""कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याने गाव कोरोनापासून दूर आहे. आता ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल. परिसरातील गावांनी कोपर्डे हवेली गावचा आदर्श घ्यावा.'' 
संभाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन : संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT