Koregaon NCP Shashikant Shinde
Koregaon NCP Shashikant Shinde esakal
सातारा

Shashikant Shinde : 'त्यांना' नाकारलं, 'तो' रिपोर्ट अजित पवारांना देणार; आमदार शिंदेंचा थेट इशारा

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही; परंतु यापुढील काळात त्यांना सन्मानाने सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणुका ताकदीने लढवून विजय मिळवू, असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पळशी (सातारा) : अडीच वर्षांच्या कारकिर्दीतील विद्यमान लोकप्रतिनिधींची कार्यपद्धती आणि गद्दारी करून, खोके घेऊन निघून गेल्यानंतर झालेल्या कोरेगाव बाजार समितीच्या (Koregaon Bazar Samiti Election) पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्याविषयी लोकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम पाहायला मिळाला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करणाऱ्यांनीच आमच्यावर बाजार समितीच्या निवडणुकीत धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप करणे हास्यास्पद व बालिशपणा आहे. ‘राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील असे सर्व नेते एकत्र होते.

त्यांच्या पॅनेलच्या विरोधात मी एकटाच लढलो,’ असे ते म्हणतात मग तुमच्या बॅनरवरही खासदार उदयनराजे भोसले, ‘‘रणजितसिंह नाईक- निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे यांचे फोटो असताना तुम्ही सर्व जण एकत्र नव्हता का, की तुमचे वागणे मान्य नसल्याने या सर्वांनीच तुम्हाला बाजूला ठेवले होते? ‘मी करेन तेच खरे,’ असे धोरण ठेवल्याचाही परिणाम असू शकतो. पराभवाचे खापर मात्र आमच्यावर फोडायचे, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांचा नामोल्लेख टाळून त्यांचा समाचार घेतला.

'आमचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने लढले'

कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेलने मिळवलेल्या विजयानंतर ल्हासुर्णे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ''रामराजे नाईक- निंबाळकर, मी, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह आमचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने लढले. या निवडणुकीतील विजयामुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे.''

'विरोधकांचे निवडणुकीचे गणित त्यांच्यावरच उलटले'

विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर मोठ्या विजयाचा आनंद उद्याच्या निवडणुकीसाठीची जिद्द कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे दिल्लीचे, राज्याचे व आपल्या विभागातील राजकारण आता लोकांना नको आहे. त्यात बदल करण्याची लोकांची भावना या निवडणुकीत दिसून आली आहे. लोकांच्या उद्रेकाला या निवडणुकीपासून सुरुवात झाली आहे. विरोधकांचे निवडणुकीचे गणित त्यांच्यावरच उलटले आहे. तालुक्याच्या तीन मतदारसंघांतील विभाजनामुळे अपयशाचे खापर मधल्या भागावर फोडले जायचे, असेही शिंदे म्हणाले.

'शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही'

या वेळी मात्र, मधल्या भागातूनच अधिक मताधिक्य मिळाले आहे. विरोधातील सुज्ञ मतदारांनीही तिकडच्या जाचामुळे आम्हाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत केली आहे. लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली होती. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींचा पराभव होऊ शकतो, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय राहिले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नाही; परंतु यापुढील काळात त्यांना सन्मानाने सोबत घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व निवडणुका ताकदीने लढवून विजय मिळवू, असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई

पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना इशारा देताना आमदार शिंदे म्हणाले, ‘‘झारीतील शुक्राचार्यांची नावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यावर मी ठाम आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या बैठकीत मी हा विषय मांडणार आहे. त्याबाबतचा रिपोर्ट अजित पवार यांनाही देणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH : हैदराबादनं टॉस जिंकला अन् श्रेयस हसला; अहमदाबादमध्ये कमिन्स 'असा' हरला

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT