development society Money Laundering sakal
सातारा

Money Laundering : मार्च एंडच्या नावाखाली सोसायट्यांत सावकारी!

शेती असो अथवा अन्य कारणांसाठी काढलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांची नियमितपणे परतफेड करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते सर्वांनीच पाळले पाहिजे.

पांडुरंग बर्गे

शेती असो अथवा अन्य कारणांसाठी काढलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांची नियमितपणे परतफेड करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते सर्वांनीच पाळले पाहिजे.

कोरेगाव - जिल्ह्यात सध्या मार्च एंडच्या नावाखाली बऱ्याच विकास सोसायट्यांतील कर्जदार शेतकरी वर्ग सोसायटी सचिवांच्या छुप्या सावकारीच्या विळख्यात अडकला जात असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहावयास मिळत आहे.

शेती असो अथवा अन्य कारणांसाठी काढलेल्या सर्व प्रकारच्या कर्जांची नियमितपणे परतफेड करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते सर्वांनीच पाळले पाहिजे. निसर्गावर भरवसा ठेऊन शेती करणाऱ्या आणि शेती कामाच्या गरजेपोटी पीक कर्ज काढणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासन योजनांतून पीक कर्जाची नियमित व वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दर वर्षी प्रोत्साहनपर अनुदान देते; परंतु बऱ्याच सोसायट्यांत १०० टक्के कर्जवसुलीच्या उद्दिष्टपूर्तीपासून ते तीन टक्के प्रोत्साहनपर अनुदान प्राप्तीसाठी सोसायट्यांचे काही सचिव थकीत अथवा चालू कर्ज मार्चअखेर थकीत दिसू नये, यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना व्याजाने रक्कम देऊन अप्रत्यक्ष छुप्या पद्धतीची सावकारी करताना दिसत आहेत. अडचणीतील शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचे यातून सर्रास दिसते.

मुळात शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे व्याजही नीट काढता येत नाही. त्यातच काही सचिव मार्चअखेरीचे भूत समोर करून थकीत शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरण नवे-जुने करण्यासाठी स्वतःच्या खिशातून व्याजाची रक्कम भरतात. त्यानंतर तातडीने संबंधित प्रकरणाची कर्ज रक्कम वाढवून घेऊन त्यातून आपण भरलेल्या व्याजाच्या रकमेवर अव्वाच्या सव्वा व्याज आकारून काढून घेतात. त्यातून रक्कम उरली, तर ती शेतकऱ्यांना परत दिली जाते. त्यातून सोसायटीची कर्जवसुली १०० टक्के होते. सचिवाला सावलीत बसून व्याज मिळते. शेतकऱ्यालाही प्रोत्साहन अनुदान मिळते.

मात्र, त्याने भरलेले व्याज, मिळणारे प्रोत्साहन अनुदान याचा मेळ घातल्यास शेतकरी मात्र पुन्हा अधिकच कर्जाच्या खाईत बुडाला जातो. एखाद्या सोसायटीत कोटभर रुपये कर्ज थकीत असेल आणि त्याचे नूतनीकरण केल्यास या आठवड्यातील ३१ मार्चअखेर अंदाजे काही लाखांचे सावकारी उत्पन्न काही सचिवांना मिळण्यात काही अडचण येईल, असे वाटत नाही. मार्चअखेर जिल्ह्यातील ९५३ विकास सेवा सोसायट्यांच्या अशा उलाढालीतून कोट्यवधींचा ‘ब्लॅक मनी’ जमा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

मार्चअखेरचे दोन दिवस बाकी आहेत. कर्जदार शेतकरी बंधूंनी तीन टक्के व्याज सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्पुरती व्याजाने रक्कम घेऊन पुन्हा अधिक कर्ज डोक्यावर वाढवून घेऊन आपले आर्थिक नुकसान करून घेऊ नये. मात्र, तुमच्याकडे स्वतःचे पैसे येतील, तेव्हा प्रथम कर्ज भरावे.

- किशोर शिंदे, माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते, कण्हेरखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT