koyana dam water storage sakal
सातारा

Koyana Dam Water : कोयना धरणात ४८.६५ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. जलाशयाच्या एकूण पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसीने भर पडली आहे.

जलाशयाचा एकूण पाणीसाठा ४८.६५ टीएमसी झाला असून, कोयना धरण अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. कोयनानगर व नवजाच्या पावसाने दोन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला होता, तर आज महाबळेश्वरच्या पावसाने दोन हजार मिलिमीटर पावसाचा टप्पा ओलांडला असून, धरण मजबूत स्थितीत पोचले आहे.

बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला तो आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत तसाच टिकून राहिला. गुरुवारी झालेल्या पावसाचे पाणी दऱ्याखोऱ्यातून धरणाच्या साठ्यात आज मोठ्या प्रमाणावर येऊ लागले.

त्यामुळे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी पाण्याची दुप्‍पट आवक होत आहे. जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ४८.६५ टीएमसी झाला असून, धरणाचा पाणीसाठा अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे.

गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ८९, नवजाला १५६ आणि महाबळेश्वरला ११८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाची पाणीपातळी २१०५.०८ फुटी झाली आहे. गेल्या २४ तासांत जलाशयात ३.४९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, पूर्व भागात गेली दोन दिवस संततधार पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने पश्चिम भागात भात लावणी अंतिम टप्प्यात असून, पूर्व भागात मात्र आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT