Earthquake esakal
सातारा

कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला; कोकण किनारपट्टीलाही हादरे

विजय लाड

गेल्या अनेक महिन्यांपासून गायब झालेल्या भूकंपानं कोयना परिसरात (Koyna) पुन्हा डोके वर काढले आहे.

कोयनानगर (सातारा) : गेल्या अनेक महिन्यांपासून गायब झालेल्या भूकंपानं कोयना परिसरात (Koyna Dam) पुन्हा डोके वर काढले आहे. रविवारी ५.७ मिनिटांनी कोकण किनारपट्टीसह कोयना व पाटण परिसर भूकंपाच्या (Earthquake) सौम्य धक्क्यानं हादरला आहे. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी होती. कोयना व पाटण या ठिकाणी भूकंपाचा धक्क्याची तीव्रता जादा असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

रविवारी सायंकाळी ५.७ वाजता कोयना पाटण, संगमेश्वर, रत्नागिरी परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला आहे. कोयना परिसरात भूकंपाच्या धक्क्याची कंपने जवळजवळ २ सेकंद जाणवली. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात तनाली गावाच्या पश्चिमेला १२ किमी होता.

भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता जादा असली, तरी या भूकंपामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील (Tehsildar Ramesh Patil) यांनी स्पष्ट केले असून कोयना धरणाला कसलीच इजा झाली नसल्याचा निर्वाळा कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT