दरड ठरणार पुन्हा धोकादायक
दरड ठरणार पुन्हा धोकादायक SAKAL
सातारा

कोयनानगर : हटवलेली दरड ठरणार पुन्हा धोकादायक

राजेश नागरे

कोयनानगर : विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी तीन गावांसाठी २२ जुलै २०२१ ची ती रात्र काळरात्र ठरली. मुसळधार पावसामुळे आपत्तींची दरड कोसळून त्या गावांचे होत्याचे नव्हते झाले. त्या गावातील दरडीने शेतजमिनींचे नुकसान केले. आता शासनाने केलेल्या साफसफाईत दरडीखालील त्या गावांतील शेतजमिनीने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र, ती गोळा केलेली दरड एका बाजूला एकत्रित करून ठेवली आहे. पहिल्याच दमदार पावसात एकत्रित केलेली ती दरड पुन्हा एकदा रस्त्यावर व गावावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवजा परिसरातील तिन्ही गावे संपर्कहिन होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर त्वरित ठोस उपाययोजनांची गरज आहे.

कोयना परिसरात गेल्या वर्षी २२ जुलैमधील पावसामुळे विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळीला आपत्तींचा डोंगर कोसळला. तीन गावांवरील संकटामुळे वित्त व मनुष्यहानी झाली. तेथे झालेल्या भूस्सखलनाने शेतजमिनी खराब झाल्या. चिखलाचा राडारोड्याने शेतीचे नुकसान झाले. ओढ्या-नाल्यांचे प्रवाह बदलल्याने शेतीही वाहून गेली. मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे गावांतील बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन झाले. निसर्गाच्या रौद्ररूपाने शेती लुप्त झाली होती. वाहून गेलेल्या शेतजमिनी पूर्ववत करण्याचे काम कोयना प्रकल्पाच्या यांत्रिकी विभाग व महसूल प्रशासनाने केले. शेतीचा प्रश्न मार्गी लागला असला तरी दरडग्रस्तांच्या समस्या संपल्या नाहीत. कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मात्र कायमचा बाकी आहे.

शेतजमिनीवरील मातीचे ढिगारे बाजूला करून दरडीखालील जमिनीचा मोकळा श्वास केला. मात्र, मिरगावला राडारोडा तसाच रस्त्याशेजारी ठेवल्याचे दिसते. मोठा पाऊस झाला की, तोच राडारोडा रस्त्यावर येऊन पुन्हा एकदा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे गाव संपर्कहिन होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पावसाळ्‍यात त्या गावांना पुन्हा पायपीटच नशिबी दिसते आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दमदार सुरुवातीनंतर दिल्लीला दोन मोठे धक्के! फ्रेझर-मॅकगर्कनंतर शाय होपही बाद

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT