President Dr. Suresh Bhosale esakal
सातारा

कृष्णा निवडणुकीत विरोधकांचे मनसुबे धुळीला; डॉ. सुरेश भोसलेंचे टीकास्त्र

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : सभासदांच्या भरघोस पाठिंब्यामुळे आमच्या जबाबदारीत वाढ झालेली आहे. येत्या काळात आमच्या कामाने सभासदांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू, असा विश्वास कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले (President Dr. Suresh Bhosale) यांनी व्यक्त केला. कृष्णा सहकारी कारखाना (Krishna Co-operative Factory) सभागृहात झालेल्या विशेष सत्कारात कऱ्हाडसह वाळवा, कडेगाव व खानापूर तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी डॉ. भोसले यांचा सत्कार केला. त्याला उत्तर देताना डॉ. भोसले बोलत होते. (Krishna Factory President Dr. Suresh Bhosale Criticizes The Opposition Satara Political News)

सभासदांच्या भरघोस पाठिंब्यामुळे आमच्या जबाबदारीत वाढ झालेली असून, येत्या काळात आमच्या कामाने सभासदांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू.

या वेळी विनायक भोसले, नवनिर्वाचित संचालक निवासराव थोरात, शिवाजी पाटील, बाबासाहेब शिंदे, बाजीराव निकम, सयाजी यादव, विलासराव भंडारे, संभाजीराव पाटील, बबनराव शिंदे, जे. डी. मोरे, ब्रिजराज मोहिते, पांडुरंग होनमाने, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले,‘‘ कृष्णाच्या इतिहासात आत्तापर्यंत अशी निवडणूक झालेली नाही. सभासदांनी मोठ्या विश्वासाने सरासरी १० हजार मतांचे लीड देऊन आमच्या सर्वच उमेदवारांना निवडून दिले आहे. सभासदांच्या भरघोस पाठिंब्यामुळे आमच्या जबाबदारीत वाढ झालेली असून, येत्या काळात आमच्या कामाने सभासदांचा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू. किंबहुना कृष्णा कारखाना (Krishna Sugar Factory Election) नंबर एकला नेण्यासाठी आजपासूनच कामाला लागण्याचा संकल्प आम्ही करत आहोत. सभासद व कार्यकर्त्यांनी मनापासून केलेल्या अविरत कष्टामुळे सहकार पॅनेलला (Co-operative panel) हे यश प्राप्त झाले आहे. कारखानदारी पुढे नेण्यासाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. तसेच कुणावरही अन्याय होणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेऊ.’’

राजकारणी मंडळींचे मनसुबे धुळीला

निवडणुकीत विरोधकांकडे विरोधात एकही मुद्दा नव्हता. तसेच त्यांच्याकडे भविष्यातील व्हिजनही नव्हते. मुख्य म्हणजे एकत्रिकरणासाठी जी राजकीय मंडळी पुढे झाली, त्यांचे मनसुबे सभासदांनी धुळीला मिळवून या राजकारण्यांना दूर ठवले, असेही डॉ. भोसले यांनी या वेळी स्पष्ट केले.

Krishna Factory President Dr. Suresh Bhosale Criticizes The Opposition Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुल परिसरात अपघाताची मालिका सुरूच; तीव्र उतारावरून येणाऱ्या ४ ते ५ गाड्यांची धडक

Mokhada Accident:'पालघर- संभाजीनगर बसला अपघात'; 25 हुन अधिक प्रवासी जखमी, तिघे गंभीर..

Latest Marathi Breaking News: घाटकोपरच्या केव्हीके शाळेत पुन्हा विषबाधेचा प्रकार

Winter Care Tips : थंडीत तुमचा कूलर बनेल Room Heater! फक्त 130 रुपयांत 'हा' करा सोपा जुगाड

Viral Video: 'झटपट पटापट, रांगोळी काढा पटापट...' डॅनी पंडितच्या गाण्याने लोकांना लावलं वेड, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT