सातारा

हे बघा! उसाला पक्ष नसतो, 'सभासदांच्या हितासह निकोप सहकार कायम ठेवण्यासाठी मी निवडणूकीच्या रिंगणात'

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : उसाला पक्ष नसतो तर शेतकऱ्याच्या हिताआड राजकारण येऊ नये, याची काळजी सध्या होताना दिसत नाही. अशा स्थितीत ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या विचारांच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात सभासदांच्या हितासह निकोप सहकार कायम ठेवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी येथे नुकतेच स्पष्ट केले. सध्या राजकारण व पक्षविरहित भूमिका सभासदांसमोर मांडून त्यांचा कल जाणून घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
उदयनराजेंची भाषा याेग्य नाही
 
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. मोहितेंनी भूमिका स्पष्ट केली. कृष्णा कारखान्याच्या कार्यक्रमासाठी (कै.) मालोजीराजे नाईक- निंबाळकर आले होते. त्या वेळी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींची आठवण करून दिली. डॉ. मोहिते म्हणाले, ""कारखान्याच्या कार्यक्रमाला आलेल्या माजी मंत्री मालोजीराजेंनी सहकाराच्या या मंदिरात राजकारणाचे जोडे कारखान्याबाहेर ठेऊन शेतकरी हित जपण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार "कृष्णा'मध्ये कारखाना हिताचा कारभार झाला आहे. मात्र, आता त्यात राजकारण शिरले आहे. कष्टकरी शेतकऱ्याला राजकारणाशी काहीही देणे घेणे नसेत, तर उसाला पक्ष नसतो, अशा स्थितीत आता राजकीय चलू मांडण्याचा विचार पुढे येऊ लागला. साखर कारखानदारीही त्याच्या आहारी गेली. कृष्णा कारखान्यात कधीही पक्षीय राजकारण नव्हते. मात्र, आता ते घोंगावू लागले आहे. पक्षीय पातळवर होणाऱ्या निर्णयावर निवडणूक तरणारी स्थिती अधिक धोकदायक आहे. निवडणुकीत काय होणार यापेक्षा निवडणुकीद्वारे शेतकरी सभासदांचे हित जोपासण्यासह निकोप सहकारासाठी आम्ही निवडणूक रिंगणात उतरलो आहे. राजकारण, पक्षाविरहित असलेली भूमिका सभासदांसमोर सध्या मांडत आहे.'' 

शरद पवारांशी पाऊण तासाच्या चर्चेनंतर उदयसिंह पडले बाहेर 

राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रेसचाही प्रभाव 

"कृष्णा'च्या रंणागणात मोहिते गटाने त्यांची बांधणी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांना एका चौकटीत विरोध करण्यापेक्षा व्यापक विचाराने त्यांच्या कृतीला विरोध करण्याची भूमिका या गटातर्फे मांडली जात आहे. पलूस, कडेगाव व कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेस, तर कऱ्हाड उत्तर, वाळवा, शिराळ्याचा भाग राष्ट्रवादीच्या विचारांचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबरच कॉंग्रसेचा प्रभाव असलेले कारखान्याचे कार्यक्षेत्र जास्त आहे, असा दावा मोहिते गटाचा आहे. त्यानुसार ते आखणी करत आहे. त्यामुळे सत्ताधारी भोसले गट म्हणजे भाजपभोवती चक्रव्यूह आखण्याची रणनीतीचा खल सध्या मोहिते गटात सुरू आहे.

भाजपच्या ताब्यातील साखर कारखान्यासाठी गोळाबेरीज सुरु; कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सेनेच्या साथीची अपेक्षा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMCला मिळाला नवा महापौर! भाजपच्या रितू तावडे यांचं शिक्षण काय? त्यांना पगार किती मिळणार?

Jalgaon Mayor Election : जळगावात महायुतीचा गुलाल! दीपमाला काळे महापौर तर मनोज चौधरी उपमहापौरपदी बिनविरोध

ZP Elections 2026 Voting Live Update : पूर्व दिल्लीतील मयूर विहार पॉकेट १ मेट्रो स्टेशनचे नाव बदलून 'श्री राम मंदिर मयूर विहार' असे केले

Ladki Bahin Yojana : धुळ्यातील 'लाडक्या बहिणीं'ना मोठा दिलासा! ५१ हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच पडताळणी

T20 World Cup: सर्वाधिक धावा, शतकं अन् विकेट्स.... कोणाच्या नावावर कोणता विक्रम? पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT