Krishna Sahakari Sugar Factory esakal
सातारा

बलाढ्य नेत्यांचे अर्ज ठरले अवैध; 'कृष्णा'च्या प्रचाराची रणनिती

सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा (Krishna Sugar Factory) प्रचार यंदा कोविडने (coronavirus) थंड केला आहे. एकमेकांविरोधातील आरोप- प्रत्यारोपांसह दावे- प्रतिदाव्यांनी गाजणाऱ्या सभाही यंदा कानावर पडणार नाहीत. त्यावर सध्या तरी निर्बंध आहेत. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या पॅनेलसह त्यांच्या नेत्यांनी व्यक्तिगत गाठीभेटवर भर दिला आहे. प्रचाराला मिळणारा कालावधी व कारखान्याचे कार्यक्षेत्र यातील तफावत पाहता शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना पायाची भिंगरीच करावी लागणार आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर (krishna sugar factory election) कोविडचे सावट आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पाडताना आव्हान आहेच, त्याचबरोबर प्रचारालाही लगाम लागला आहे. दोन्ही मोहितेंची आघाडी होणार, अशी चर्चा असतानाच तिन्ही गटांनी वेगवेगळे अर्ज दाखल झाल्याने राजकीय ट्‌विस्ट तयार झाला आहे. (krishna-sugar-factory-election-news-atul-bhosale-indrajeet-mohite-avinash-mohite-panel)

कारखान्याचे दोन जिल्ह्यांतील पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यात तब्बल 47 हजार 160 सभासद आहेत. त्यातील कऱ्हाड व वाळवा तालुक्‍यांत सर्वाधिक सभासद आहेत. त्यामुळे त्या सभासदांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न कमी दिवसांत करावा लागणार आहे. जाहीर सभांना परवानगी मिळण्याची शक्‍यता धुसर आहे, तीच स्थिती गृहीत धरून तिन्ही पॅनेलच्या नेत्यांना व्यक्तिगत गाठीभेटीवर भर दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सभासदांच्या गाठीभेटीसाठी तिन्ही पॅनेलचे नेते, तसेच उमेदवारांना पायाची भिंगरी करावी लागणार आहे.

कोविडची स्थिती भयानक आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत आहे. प्रचारात वैयक्तिक गाठीभेटीवर भर द्यावा लागणार आहे. अर्ज काढून घेण्याची मुदत संपली, की जाहीर प्रचाराला परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, सभासदांपर्यत पोचून त्यांना भूमिका समाजावून सांगण्याचे सगळ्यांसमोर आव्हान पेलावेच लागणार आहे. त्यामुळे कोविडच्या स्थितीतही होणारा प्रचार अत्यंत बारकाईने करावा लागणार आहे असे जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते अतुल भोसले (atul bhosale) यांनी सांगितले.

संस्थापक पॅनेलचे नेते अविनाश मोहिते (avinash mohite) म्हणाले सभासदांच्या गाठीभेटी व त्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन भेट घेण्यावर भर देणार आहोत. सोशल डिस्टन्सचा नियम पाळून कोविडचा प्रसार होणार नाही याची काळजी घेऊन जाहीर प्रचाराची दिशा ठरवावी लागेल. अद्यापही त्याबाबत कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या काळात व्यक्तिगत गाठीभेटींवर अधिक भर देऊन सभासदांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करू.

यशवतंराव मोहिते (indrajeet mohite) रयत पॅनेलचे नेेते डॉ. इंद्रजित मोहिते यांनीही प्रचार हा संयमानेच करावा लागेल असे नमूद केले. ते म्हणाले कोविडच्या गंभीर स्थितीचा विचार करून कारखान्याचा प्रचार करावा लागेल. शासकीय नियमांचे पालन करून व्यक्तिगत सभासदांच्या गाठीभेटीवर भर देऊन त्यांना विश्वास द्यावा लागणार आहे. त्यासाठी सातारा व सांगली जिल्ह्यांत प्रचाराचे विकेंद्रीकरणाचे नियोजन करावे लागेल. दोन जिल्ह्यांतील पाच तालुक्‍यांतील सभासदांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करायचा आहे. जाहीर प्रचाराची परवानगी मिळाल्यास तोही प्रचार संयमानेच करावे लागेल असेही सांगितले.

Suresh-Avinash-Indrajeet

"कृष्णा'च्या छाननीत 22 अर्ज अवैध

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठीच्या बुधवारी झालेल्या अर्ज छाननीत 22 अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे रिंगणात 213 उमेदवार राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश आष्टेकर यांनी दिली. एकापेक्षा जास्त अर्ज भरलेल्या 70 उमेदवारांचे दुबार अर्जही बाद ठरविण्यात आले आहे. केवळ तीन हरकती दाखल होत्या. त्याही फेटाळल्या आहेत. छाननीच्या निकषानुसार 22 जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामध्ये सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम (vishwajeet kadam) यांचे चुलते ज्येष्ठ नेते रघुनाथ कदम, काले येथील ज्येष्ठ नेते डॉ. अजित देसाई यांचा समावेश आहे असल्याचे आष्टेकर यांनी नमूद केले.

कारखान्याच्या 21 जागेसाठी 305 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांची बुधवारी छाननी सकाळी येथील बाजार समितीच्या सभागृहात सुरू झाली. त्यात पहिल्यांदा दुबार अर्ज दाखल झालेले 70 जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यानंतर तीन हरकती दाखल होत्या. मात्र, त्या फेटाळण्यात आल्या. त्यानंतर सुरू झालेल्या छाननीत सलग तीन वर्षे ऊस न घालणे, कर्ज थकीत ठेवणे अशा विविध कारणांनी 22 जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. त्यात ज्येष्ठ नेते कदम, काले येथील डॉ. देसाई यांचा समावेश आहे. छाननीनंतर कृष्णा कारखान्यासाठी रेठरे बुद्रुक-शेणोली गटात 28, वडगाव हवेली- दुशेरे 45, रेठरे हरणाक्ष-बोरगाव 47, कार्वे-काले 43, नेर्ले-तांबवे गटातून 32, येडेमच्छिंद्र-वांगी गटातून 20, महिला राखीवसाठी 33, अनुसूचित जाती जमाती गटातून 17, अर्ज विमुक्त जाती भटक्‍या जमाती गटात 12 व इतर मागास राखीव गटात 12 अर्ज दाखल आहेत.

गटनिहाय अपात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी : रेठरे बुद्रुक- शेणोली गट : ज्येष्ठ नेते रघुनाथ कदम (रा. सोनसळ, ता. कडेगाव), दिलीप सावंत (रा. शेरे). वडगाव हवेली - दुशेरे गट : उत्तम खबाले, तानाजी खबाले (दोघे, रा. विंग), अभिजित जगताप, विजय जगताप (दोघे, रा. वडागव हवेली), गजानन जगताप (रा. कोडोली), विश्वास शिंदे (रा. कुसूर). काले- कार्वे गट : डॉ. अजित देसाई, उमा देसाई, विकास देसाई, शिवाजी देसाई, विजय पाटील (सर्व, रा. काले), विशाल पाटील (कोडोली).

नेर्ले- तांबवे गट : अवधूत जाधव-पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा). रेठरे हरणाक्ष - बोरगाव गट : रघुनाथ खोत (रा. कामेरी, ता. वाळवा), शहाजी पाटील (रा. बहे, ता. वाळवा), विलास शिंदे (बोरगाव, ता. वाळवा). येडेमच्छिंद्र -वांगी गट ः प्रतापसिंह जाधव (हिंगणगाव खुर्द, ता. कडेगाव) विश्वास जाधव, मुकुंद जोशी (रा. कुंडल, ता. पलूस), भारत पाटील (रा. चिंचणी-वांगी, ता. कडेगाव).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT