Udayanraje Shivendraraj Bhosale Satara  esakal
सातारा

Satara : राड्यानंतर शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसमोरच फोडला नारळ; म्हणाले, कायदेशीर असेल ते..

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता आहे.

सकाळ डिजिटल टीम

खासदार उदयनराजेंनी न्यायालयाचा अवमान केला जाऊ नये, अशी भूमिका पोलिसांसमोर मांडत कार्यक्रम थांबवावा, असं म्हटलं होतं.

सातारा शहरालगत आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचे (Krushi Utpanna Bazar Samiti) भूमिपूजन होणार होते. यासाठी उभारलेल्‍या मंडपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) समर्थकांनी मोडतोड करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांनीही तिथं जाऊन तळ ठोकला आहे.

खासदार उदयनराजेंनी न्यायालयाचा अवमान केला जाऊ नये, अशी भूमिका पोलिसांसमोर मांडत सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम थांबवावा, असं म्हटलं होतं. दरम्यान, उदयनराजे आणि पोलिसांच्या उपस्थित कार्यक्रमस्थळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नारळ फोडत नूतन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पाडला.

यावेळी शिवेंद्रराजेंनी जे कायदेशीर असेल ते करावं, असं पोलिसांना सांगितलं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकहाती सत्ता आहे. सध्या ही इमारत सातारा एसटी परिसरात आहे. नव्या इमारतीसाठी शहरालगत खिंडवाडी इथं जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी भूमिपूजनचा कार्यक्रम शिवेंद्रराजे यांच्या उपस्थित होणार होता. मात्र, उदयनराजेंच्या समर्थकांनी इथं राडा घातला. त्यामुळं काही काळ इथं गोंधळ निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT