सातारा

कुसरुंडच्या मळाईदेवीची यात्रा रद्द

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता लक्षात घेता कुसरुंडची (ता. पाटण) मंगळवारी (ता. 15) होणारी ग्रामदैवत श्री मळाईदेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी, ग्रामस्थांनी यात्रा उत्सव घरीच साजरा करण्याचे आवाहन सरपंच खाशाबा पवार यांनी केले आहे.
 
येथील ग्रामपंचायत कार्यालयात श्री मळाईदेवी व मारुतीदेव देवस्थान ट्रस्ट आणि यात्रा समितीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुसरुंड गावात श्री मळाईदेवीची यात्रा देवदीपावली या दिवशी मुख्य दिवस म्हणून साजरी होते. मंगळवारी (ता. 15) यात्रेचा मुख्य दिवस आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी होऊन कोरोना वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. शासनाने यात्रेसंदर्भात कडक निर्बंध घातले आहेत. शासनाकडून यात्रेसंदर्भात परवानगी नसल्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे श्री मळाईदेवीची यात्रा रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. 

म्हसवड : उद्यापासून तीन दिवस जमावबंदी; वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

यात्रा परिसरात कुणीही दुकाने थाटू नयेत, महिलांची धारेखाली बसण्याचा परंपरा यावेळी होणार नाही. यात्रेच्या ठिकाणी येणारांवर कारवाई केली जाईल. यात्रेदिवशीचा धार्मिक विधी प्रथा आणि रुढीनुसार गुरव, सेवेकरी, मानकरी, विश्वस्तांच्या उपस्थितीत करून मंदिर बंद केले जाईल आदी निर्णय झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तान स्पर्धेतून आऊट होताच ३ सेमीफायनलिस्ट पक्के; आता तिकीटासाठी शर्यत, पण कसे आहे समीकरण?

आजचे राशिभविष्य - 01 मार्च 2026

Mushroom Omelet Recipe: मुलांसाठी नाश्त्यात 10 मिनिटांत तयार करा हेल्दी मशरूम ऑम्लेट; वीकेंड होईल स्पेशल

Panchang 1 March 2026: आजच्या दिवशी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आणि ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

IPL 2026: CSK च्या तयारीला सुरुवात! धोनीसह कर्णधार ऋतुराजची महाराष्ट्राच्या 'धुरंधरां'सोबत चेन्नईत एन्ट्री; पाहा Video

SCROLL FOR NEXT